महिला योग समितिने केला यशस्वी महिलांचा सत्कार
महिला आता प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कासमगिरी करून भरारी घेत आहे.पुरुषांच्या तुलनेत महिला मागे नाही.राजकारणात तर महिलांसाठी आरक्षणही आले आहे.देशातील सर्व क्षेत्र भारतीय नारीने व्यापले आहे.समाजसेवेतही महिला पुढे आहे.असे असले तरी कुटुंब तुटण्याचे प्रमाणही वाढत आहे,हे विसरून चालणार नाही.महिलांनी आपल्या कुटुंबाकडेही लक्ष दिले पाहिजे.उंच भरारी घ्या,पण कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन सपना सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नवजीवन महिला योग समितीच्या वतीने तुकूम येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित यशस्वी महिलांचा सत्कार कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.यावेळी अध्यक्षस्थानी योग प्रशिक्षक विजय चंदावार यांची तर अतिथी म्हणून डॉ. शर्मीली पोद्दार,डॉ. गोपाल मुंधडा, सुभाष कासनगोट्टूवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, शरद व्यास, रमेश ददगाल, मुर्लीधर शीरभय्ये, माया उईके, शीलाताई चव्हाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सपना नामपल्लीवार यांनी केले. संचालन वनश्री मेश्राम तर आभार शुभांगी डोंगरवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी संगीता. चव्हाण,जयंती गहुकर,अक्षता देवाडे, नीलिमा गोगीरवार, शोभा कुळे व योगनंदिनी समूहाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.