* रोजगार निर्मितीसाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज आधारित प्रकल्प उभारा – आ. किशोर जोरगेवार *

0
20

************************

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली मागणी * 

****************************

चंद्रपूर लगत असलेल्या व गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे सहा लोहखजिन प्रस्तावित खाणी आहेत. त्यामुळे आता चंद्रपूर गडचिरोली जिल्हात लोहखनिजावर आधारीत प्रकल्प सुरु झाल्यास येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर-गडचिरोली जिल्हात लोहखनिज आधारित प्रकल्प उभारा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेत केली आहे.

*****************************

मतदार संघातील विविध प्रश्न मार्गी काढण्यासाठी आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन देत चंद्रपूर-गडचिरोली जिल्हात लोहखनिज आधारित प्रकल्प सुरु करण्याची मागणी केली आहे.

******************************

महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील सूरजगड येथील 6 लोहखनिज खाणीची भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर द्वारे एमएससीटी मार्फत संयुक्त परवान्यासाठी निविदा प्रकाशित केली होती. त्यानुसार या सर्व सहा लोहखनिज खाणीच्या उत्खनन व रॉयल्टीच्या अधिक बोलीसह बोली प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा महसूलात वाढ होणार असून लोहखनिज खाणीत उत्खनन सुरु होत असल्याने रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

*****************************

चंद्रपूर-गडचिरोली हे दोन्ही जिल्हे वनसंपदा, खनिजसंपदा, जलसंपदा समृद्ध असूनही आर्थिकदृष्ट्या, नक्षलप्रभावित व औद्योगिकदृष्ट्या अविकसित जिल्हे आहेत. त्यामुळे सुरजागड लोहखनिज खाणी ह्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वरदान ठरणार आहे.

*************************

राज्य शासनातर्फे सुरजागड येथील 6 लोहखनिज खाणींची यशस्वीरित्या कंपोझिट लायसन्स ब्लॉक पूर्ण केल्याने येथे नव्याने लोहखनिज उत्खनन होणार आहे. लोहखनिज प्रक्रिया उद्योगास वीजेची मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र आहे. सदर खाणींमधून निघणाऱ्या लोहखनिजावर प्रक्रिया उद्योग हे चंद्रपूर-गडचिरोली ह्या दोन जिल्ह्यात उभारल्यास  ह्या जिल्ह्यातील कुशल बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.  तसेच जिल्ह्याचा आर्थिक, सामाजिक, भौगोलिक व सर्वांगीण विकासाला यामुळे चालना मिळणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असुन चंद्रपूर-गडचिरोली जिल्हात लोहखनिज आधरित प्रकल्प सुरु करण्याची मागणी केली आहे.

*****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here