*ग्रामपंचायत कडून दूषित पाणी पुरवठा : ५ हजार घोडपेठवासियांचे आरोग्य धोक्यात*

0
28

***************************

*आम आदमी पार्टी भद्रावती कडून घोडपेठ ग्रामपंचायतची पोलखोल* 

****************************
*पक्ष्यांचे पंख व मासांचे तुकडे नळाद्वारे* 

****************************

तालुक्यातील घोडपेठ ग्रामपंचायती द्वारे गेल्या ५ महिन्यापासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असून गुरुवारला चक्क नळाद्वारे पक्षांचे पंख व मासाचे तुकडे आल्याने हा संपूर्ण प्रकार ग्रामस्थांनी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कळविला.त्यांनी प्रत्यक्षरीत्या पाहनी करून ही बाब समंधित अधिकाऱ्यांना कळविली.अशी माहिती आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत दिली.या दूषित पाण्यामुळे ५ हजार ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
घोडपेठ ग्रामपंचायत येथे २o२१ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. त्याद्वारे गावातील तब्बल सातशे घरांना नळाव्दारे दररोज पाणीपुरवठा केल्या जातो. नळधारकांना वार्षिक १५०० रुपये पाणी पट्टी कर आकारण्यात येत आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतीने गेल्या ५ महिन्यापासून हे जलशुद्धीकरण केंद्र देखभालीच्या नावाखाली बंद ठेवले आहे. ग्रामपंचायत देखभाल दुरुस्ती खर्च करण्यास असमर्थ असल्याची माहिती सरपंच व सचिव यांनी दिली. गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण गावाला दूषित पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. दररोज पाण्याद्वारे काही ना काही घाण वस्तू येत असल्याचा आरोपही त्यांनी पत्र परिषद केला. घोडपेठ ग्रामपंचायतचे सदस्यांनी सरपंच , सचिव ,पंचायत समिती सवर्ग विकास अधिकारी , अभियंता जीवन प्राधिकरन विभाग चंद्रपूर यांना निवेदन दिले. तरी पाण्यासारख्या जीवनावश्यक विषयाकडे सरपंचासह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संपूर्ण गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच ग्रामपंचायतीने जल शुद्धीकरण केंद्र बंद का ठेवले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी पत्र परिषदेत करण्यात आली. यावेळी आम आदमी पक्षाचे सुरज शाहा, सुमीत हस्तक, सरताज शेख, नितीन निमसरकर , आशिष दांडेकर, विजय सपकाल, अनिल राम आदी उपस्थित होते.

******************************

देवा शंकावार ग्रामपंचायत सदस्य घोडपेठ ग्रामपंचायत जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा सुरळीत होत होता. गेल्या पाच महिन्यापासून जल शुद्धीकरण बंद असल्यामुळे तसेच दूषित पाणी पुरवठा करीत आहे. या बाबतची जबाबदारी सरपंच व सचिवाची आहे मात्र दोघेही लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अनिल खडके – ग्रामपंचायत सरपंच घोडपेठ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता या प्रकाराबाबत माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मी तुम्हाला थोड्या वेळानंतर माहिती देतो असे म्हणाले व नंतर त्यांचेशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

*************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here