*पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण तथा सत्कार सोहळा वरोरा दिनांक 3 जानेवारी*

0
27

=====================

*जीवन गौरव व वरोरा भूषण पुरस्कार वितरण*

==≠=====================

     * वरोरा*

===≠====================
वरोरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून नूतन कार्यालय लोकार्पण तथा मान्यवरांचा सत्कार सोहळा शनिवार दि 6 जानेवारी ला सायंकाळी 4 वाजता पत्रकार संघ कार्यालय, जुनी नगरपालिका येथे आयोजित केलेला आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती राहणार असून, वरोरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी गजानन भोयर, जिल्हा माहिती अधिकारी चंद्रपूर, राजेश येसनकर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंत टेंमुर्डे आणि माजी नगराध्यक्ष विलास टिपले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी पत्रकार पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून वरोरा शहराच्या लौकिकात भर घालणारे आदित्य चंद्रभान जिवने (IAS ), सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना वरोरा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य राजाभाऊ लोणारकर यांना जीवनगौरव तसेच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवडून आलेले ज्येष्ठ पत्रकार बाळू भोयर यांचाही सत्कार याप्रसंगी आयोजित केलेला आहे.
पत्रकार संघाचे सदर कार्यालय हे वरोरा तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना, संस्था आणि सर्वसामान्य व्यक्तींना पत्रकार परिषदा घेण्याकरिता विनामूल्य उपलब्ध असणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली. कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले
============================
      आदित्य जीवने
    राजाभाऊ लोणारकर
        बाळू भोयर

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here