भद्रावतीत अवाजवी वीज बिलाविरोधात शिवसेनेचा पवित्रा आक्रमक.
7 दिवसांत प्रश्न न सुटल्यास MSEB कार्यालयास टाळे ठोकू: सुरज शाहा.
HELLO CHANDA NEWS
भद्रावती(ता.प्र.): चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील भंगाराम वॉर्ड येथील रहिवासी सौ. गीता चंद्रदीप उईके यांना महावितरण (MSEDCL) कडून नोव्हेंबर 2025 महिन्याचे तब्बल ₹34,960/- इतके अवाजवी, अन्यायकारक व संशयास्पद वीज बिल देण्यात आले आहे. सदर घरात फक्त 2 सदस्य वास्तव्यास असून एकही AC नसताना तसेच 6 महिन्यांपूर्वी नवीन मीटर बसवूनही इतके प्रचंड बिल कसे येते, असा गंभीर प्रश्न सुरज शाहा यांनी संबंधितांना विचारला आहे, हे मात्र विशेष!
या गंभीर विषयावर शिवसेनेच्या वतीने भद्रावती महावितरण कार्यालयाला विशेष निवेदन देण्यात आले असून हा निवेदन देताना शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे व युवासेना जिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांच्या मार्गदर्शनात, युवासेना लोकसभा सचिव सुरज शाहा यांच्या नेतृत्वात आणि युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, घरगुती मर्यादित वापर असूनही इतके प्रचंड बिल येणे हे मीटर faulty किंवा रिडींग घोटाळ्याचा संशय निर्माण करते. नवीन मीटर असूनही अचानक युनिट्स वाढ दाखविणे हे महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते. सर्वसामान्य नागरिकांची अशी आर्थिक व मानसिक छळवणूक शिवसेना कदापि सहन करणार नाही.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम इशारा दिला की,
येत्या 7 दिवसांच्या आत सदर वीज बिल दुरुस्त करण्याचे योग्य निर्णय घेण्यात आले नाही, तर शिवसेनेच्या वतीने भद्रावती MSEB कार्यालयास टाळे ठोकू आंदोलन करण्यात येईल, आणि त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस महावितरण प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील असे देखील सांगण्यात आले असून सबंधित अधिकाऱ्यांनी या विषयावर योग्य निर्णय घेतलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका शिवसेना युवासेना कडून व्यक्त केली जात आहे व बुद्धिजीवी वर्गात सुद्धा या अवाजवी वीज बिल बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे .
निवेदन देताना पीडित घरमालक सौ. गीता चंद्रदीप उईके, शिवसेना उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, सागर कोल्हटकर, युवासेनेचे अनोखा गेडाम तसेच शिवसेना युवासेनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*