HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या, त्याग, समर्पण व संघर्षाचे प्रतीक असलेल्या पूजनीय रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज बुधवारी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे विनम्र अभिवादन व मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रमाबाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनकार्याला अभिवादन करत, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यात दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
“एका महान व्यक्तिमत्त्वामागे उभे असलेले त्यागमय सामर्थ्य म्हणजे रमाई,” अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमात रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
समाजातील वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी उभारलेल्या चळवळीला रमाई यांनी दिलेली साथ ही भारतीय समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असा भाव यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी भाजप महानगर महामंत्री सविता दंडारे, विधानसभा प्रमुख वंदनाताई हातगावकर, नगरसेविका पुष्पाताई उराडे, ज्योती जीवणे, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे, सुमित बेले, राकेश नाकाडे, राकेश बोमनवार, अनुसूचित जाती मोर्चा महामंत्री नीलिमा वनकर, सपना सातपुते, शालू कन्नोजवार, भावना बरसागडे, शालिनी राऊत, कल्पना दुधे, लता ब्राम्हणे, भाग्यश्री येरणे, रेश्मा पांडे, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























