Home
Home चंद्रपूर चंद्रपूरच्या कडक उन्हात कामगारांसाठी विद्युत विभागाचा मानवतेचा हात; बंगाली कॅम्प कामगार चौकात...

चंद्रपूरच्या कडक उन्हात कामगारांसाठी विद्युत विभागाचा मानवतेचा हात; बंगाली कॅम्प कामगार चौकात पाण्याच्या बाटल्यांचे वाटप”

0
77

HELLO CHANDA NEWS

    चंद्रपूर,(का. प्र.) :सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने बंगाली कॅम्प कामगार चौक येथे उष्णतेने त्रस्त कामगारांसाठी मानवतेचा संदेश देणारा विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

   चंद्रपूरच्या कडक उन्हामुळे आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रचंड तापमानामुळे उन्हात मेहनत करणाऱ्या कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर कामगारांना दिलासा मिळावा या उद्देशाने कामगारांना थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

   या उपक्रमात EETA बॉडी इन्चार्ज प्रा. सुयोग संघरत्न ढोके तथा प्रा. दीपाली आर. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ५८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

                 सकाळच्या वेळेतच कामगार चौक परिसरात मोठ्या प्रमाणात कामगारांची वर्दळ असताना विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत प्रत्येक कामगारापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविले.

      विद्यार्थ्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे परिसरात सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश पोहोचला.

 चंद्रपूर जिल्हा हा उष्ण तापमानासाठी ओळखला जात असून उन्हाळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

 अशा तीव्र उष्णतेमध्ये रस्त्यावर कष्ट करणाऱ्या कामगारांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

            ही बाब लक्षात घेऊन विद्युत विभागातील विद्यार्थ्यांनी “मानवतेची खरी सेवा हीच समाजसेवा” या भावनेतून हा उपक्रम राबविला.

        विद्यार्थ्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांना उन्हाळ्यात पाणी पिण्याचे महत्त्व व आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

     या उपक्रमामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

       अचानक मिळालेल्या या मदतीमुळे अनेक कामगारांनी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले.

           विद्यार्थ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे उपस्थित नागरिकांनीही विशेष कौतुक केले.

          या सामाजिक उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे तसेच विद्युत विभाग प्रमुख डॉ. आर. के. धात्रक यांचे विशेष मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले. प्रा. सुयोग संघरत्न ढोके व प्रा. दीपाली आर. वैद्य यांनी विद्यार्थ्यांना समाजातील गरजू घटकांसाठी नेहमी पुढाकार घेण्याचे मार्गदर्शन केले.

    विद्यार्थ्यांनीदेखील भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

     मानवता, सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जपणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असून विद्युत विभागाच्या या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here