मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासाठी चंद्रपूर मनपा कर्मचाऱ्यांची गस्त

0
70

चंद्रपूर – जनता चौक पेट्रोल पंप जवळील नाल्यात एक म्हैस अचानक पडुन जखमी झाल्याची घटना घडली . या म्हशीची मनपा स्वच्छता विभागामार्फत सुखरूप सुटका करण्यात आली .
बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास जनता चौक येथे असलेल्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी नाल्यात म्हैस पडल्याबाबतची सुचना मनपा स्वच्छता विभागास दिली . त्यानुसार घटनास्थळी स्वच्छता विभागाचे कर्मचारी पोहोचले व सकाळी १० वाजेपर्यंत म्हशींची सुखरूप सुटका करून पुढील उपचाराकरीता प्यार फाउंडेशन येथे पाठविण्यात आले . चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सातत्याने सुरू असते . शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात , मुख्य रस्त्यांवर मलमुत्र विर्सजन करुन अस्वच्छता करतात . स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे दररोज शहरात गस्त घालून दिवसा तसेच रात्री सुद्धा मोकाट जनावरांवर कार्यवाही केली जाणार आहे शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते . अपघातात वाहनचालक व जनावरे दोघांनाही दुखापत होण्याची शक्यता असते . त्यामुळे जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांची योग्य बंदोबस्त करावा , मोकाट व पाळीव जनावरे जसे श्वान , गाई , म्हैस , गाढव , वराह , उंट , बकरी , मांजर इत्यादी शहरात मोकाट सोडता कामा नये अन्यथा मनपा नियमानुसार जप्तीची कारवाई केली जाईल व नियमानुसार दंड आकारण्याचा इशारा मनपातर्फे देण्यात आला आहे

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here