चंद्रपुरात,लोकनेते आ.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत डॉ.सच्चिदानंद शेवडे यांची व्याख्यानमाला

0
124

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य

येथिल डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षाचे औचित्य साधून, हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर एक झंझावात’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन 8 ते 10 ऑगस्ट पर्यंत सायंकाळी 7 ते 9 वाजता दरम्यान करण्यात आले आहे.
यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष म्हणून माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची उपस्थिती राहणार असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते आणि साहित्यिक डॉ.सच्चिदानंद शेवडे सावरकर एक झंझावात या विषयावर 8 व 9 ऑगस्टला प्रकाश टाकणार आहेत.तर ते 10 ऑगस्टला वंद्य वंदे मातरम’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.विशेष म्हणजे लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून काही वर्षांपूर्वी,विशेषतः युवावर्गासाठी आजोजित व्याख्यानमालेत डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या ज्वाजल्य देशभक्तीच्या प्रवासाचे वर्णन केले होते.सर्व देशभक्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीं केले आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here