हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हा अमृत महोत्सव जल्होशात साजरा करत असतांना स्वातंत्र्यासाठी बलीदान देणा-या स्वातंत्र सैनिकांनाही आपण स्मरण केले पाहिजे. येत्या १५ ऑगस्टला प्रत्येक घरी तिरंगा लागला पाहिजे असे आवाहण करत आपणही चंद्रपूरात १०० फुट उंचीचा राष्ट्रध्वज लागावा यासाठी नियोजन केले असुन त्यासाठी जिल्हाधिकारी यांना २५ लक्ष रुपयांचा निधी दिला असुन यातुन चंद्रपूर येथे १०० तर घुग्घुस येथे ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उप्रकमाबाबत जनजागृती करण्यासाठी क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि नेहरु युवा केंद्र या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि तिरंगा हा देशाची शान आहे. संपुर्ण देश वासियांना तिरंग्या प्रती आदर आहे. त्यामुळे केद्र सरकारने यंदा हर घर तिरंगा हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चंद्रपूरातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑगस्टला चंद्रपूरातील प्रत्येक घरी तिरंगा लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलुन दाखविला. राज्यातील प्रत्येक तालुक्यात 75 ते 100 फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्याची यावा अशी भुमिका राज्य सरकारणे घेतली आहे. आपणही यासाठी आपल्या विधानसभा क्षेत्रात येणा-या घुग्घुस आणि चंद्रपूर येथे सदर उंचीचा राष्ट्रध्वज कायमस्वरुपी लहरत राहावा यासाकरिता 25 लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळता केला आहे. या निधीतुन राष्ट्रध्वज उभारण्यासह महापुरुषांचे भिंत शिल्प उभारण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
हर घर तिरंगा या अभियानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. 15 आॅगस्टसाठी लोकांमध्येही उत्साह आहे. मात्र केवळ 15 आॅगस्ट आणि 26 जानेवारी पूरता न राहता तो कायम राहला पाहिजे असेही यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. आमदार किशोर जोरगेवार आणि उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दिल्या नंतर जिल्हा क्रिडा संकुल बॅटमिंटन हाॅलच्या गेटपासुन सदर सायकल रॅलीला सुरवात झाली. रॅली अभियानाबात जनजागृती करत शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्त झाली. या रॅलीत सायकल क्लब, क्रिडा मंडळे, नागरिक, शासकीय निमशासकीय कार्यालयीन कर्मचारी आदिंनी सहभाग घेतला होता.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793