नागपूर येथील विधान भवन मधील व्यवस्था अद्यावत करा – आ. किशोर जोरगेवार विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांची भेट घेत मागणी

0
49

नागपूर येथील विधान भवन हे विदर्भासाठी प्रमुख ठिकाण आहे. मात्र येथे योग्य सोयी सुविधा नाही. येथील आमदार निवसामधील अनेक पदेही रिक्त आहे. त्यामूळे हे पदे भरुन येथील आमदार निवासामध्ये आमदारांच्या राहण्याची व्यवस्था करत सदर विधान भवन व्यवस्था अद्यावत करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांची मुंबई येथे भेट केली आहे.
नागपूर हि राज्याची उपराजधानी असून नागपूर करारानुसार वर्षातून किमान एक अधिवेशन येथे  होत असते. त्यामुळे आमदारांना निवासाकरिता नागपूर येथे  आमदार निवास उपलब्ध आहे. परंतु नागपूर येथील आमदार निवासात व्यवस्थेसाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे इमारतींची देखभाल व खोल्यांच्या रखरखाव करिता अडचण येत आहे. अधिवेशन संपल्यावर आमदार निवास सामाजिक, सांस्कृतिक, वाणिज्यिक कामासाठी भाड्याने दिले जाते.  त्यामुळे आमदार निवासाची दुरावस्था होत आहे. अधिवेशन काळानंतर येथे सुरक्षा कमी असते. त्यामुळे आमदार निवासाची सुरक्षा व्यवस्था अधिकच तोकडी आहे. आमदार निवासाची व्यवस्था बांधकाम विभागाकडे असून तीन इमारतींमध्ये ३८६ खोल्या आणि ०७ सभागृह आहेत. या तीन इमारतींच्या व्यवस्थापनासाठी ४१० मंजूर पदे आहेत. परंतु प्रत्यक्षात पन्नासही कर्मचारी या आमदार निवास व्यवस्थेकरिता उपलब्ध नाही. आमदार आपल्या शासकीय कार्यासाठी नागपूर येथे आल्यास या सर्व अडचणींमुळे येथे निवास करीत नाही. त्यामुळे कामकाज करण्यास अडचण येत आहे. हि बाब लक्षात घेता पद भरती करत मुंबई येथील आकाशवाणी आमदार निवास च्या धर्तीवर नागपूर येथील आमदार निवासमध्ये आमदारांना कायमस्वरूपी स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिल्यास खोल्यांची देखभाल अधिक चांगल्याप्रकारे होऊ शकते. त्यामुळे याकडे गांर्भियाने लक्ष देत  नागपूर येथील आमदार निवास येथील अडचणी दूर करून नागपूर येथील विधान भवनाची व्यवस्था अद्यावत करत आमदारांना मुंबई येथील आमदार निवासा प्रमाणे स्वतंत्र निवासकक्ष उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना केली आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here