चंद्रपुर शहरातील हनुमान खिडकी येथील बुरूज क्रमांक 15 वर परिसरातील सामाजिक कार्यात शहरात अग्रेसर असणारी हनुमान मंदिर समिती तर्फे आयोजित भा.ज.यु.मो. (मध्य) बाजार मंडळ अध्यक्ष गणेश भाऊ रामगुंडेवार यांचा नेतृत्वाखाली आज स्वात्रंत दिन ध्वजाचे खरे महत्व जाणणारे भारतीय सेवानिवृत्त माजी सैनिक सागरजी गोविंदवार सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आलेत.प्रत्येक नागरिक हा देशाप्रती समाजाप्रती नागरिक कर्तव्य पार पाडायला हवं तेव्हाच खर्या अर्थाने स्वातंत्र्याचे महत्व टिकेल अशी भावना या क्षणी माजी सैनिक सागरजी गोविंदवार सर यांनी व्यक्त केली.
सोबतच परिसरातील बाल गोपालांनी उपस्थितांसमोर स्वतंत्र दिनानिमित्त भाषण सादर करून मन जिंकण्याचे कार्य केले. परिसरातील चौही बाजूने पाऊस सुरू असताना देखील छत्री रेनकोट परिधान करून रॅली द्वारे जयघोष म्हणत लहान मुलामुलींनी तसेच परिसर जेष्ठ यांनी देश हित विषयावर नारे म्हणत साजरा केला.
स्वातंत्र्य दिना सोबतच प्रत्येक दिवस हा समाजा प्रती असलेली भूमिका सत्य बाजु घेऊन तसेच सामाजिक हित लक्षात घेऊन नेहमी प्रत्येक संकटकाळी वृध्द तसेच गरजुंची मदत करून दायित्व पार पाडावे.असे उद्गार या क्षणी गणेश रामगुंडेवार यांचातर्फे उपस्थितांना मिळाले.
या सोहळा क्षणी सेवानिवृत्त सैनिक प्रदीपजी गंधारे सर यांचा सत्कार करण्यात आले. उपस्थित बाल गोपालांनी उपस्थीत भारतीय सैनिक सोबत मोबाईल ने क्षणचित्रे घेऊन आनंद द्विगुणित करण्यात आले.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793