आमदार निधीतुन मिळणार सहा ईसीजी मशीन, आ. जोरगेवार यांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावाशा
सकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महत्वाच्या तपासणीचे उपकरणे बंद असणे ही गंभीर बाब आहे. याकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर हे योग्य नाही. ईसीजी मशीनरीची कमतरता लक्षात घेता 6 मशिन आमदार निधीतुन आपण उपलब्ध करुन देऊ, हे रुग्णालय चंद्रपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील नागरिकांच्या उपचाराचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे येथील व्यवस्था सुसज्ज असलीच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत येथील बंद असलेली महत्वाची उपकरणे तात्काळ कार्यन्वित करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्याल प्रशासनाला केल्या आहेत.
आज शनीवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या आहे. या प्रसंगी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मोहन खामगावकर, वैद्यकीय अधीक्षक निवृत्ती जिवने, उप वैद्यकीय अधिक्षक भुषन नैताम, औधषीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. देशपांडे, औषध शास्त्र विभागाचे सहाय्य प्रा. डॉ. मिलिंद चव्हाण, अधिरिकरन शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. नागेश नागमोठे, स्त्री व प्रसूती विभागाच्या सहाय्यक प्रा. दिप्ती श्रीरामे, आदींची उपस्थिती होती.
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, रुग्णालय येथील अनेक तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने आज शनीवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे भेट देत येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी 17 व्हेंटिलेटर पैकी 13 व्हेंटिलेटर उपकरण नादुरुस्त असल्याची बाब लक्षात आली. यावर तात्काळ तोडगा काढून सदर मशनरी दुरुस्तीचे काम तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. यासाठी लागणार असलेल्या बायो-मेडिकल अभियंत्याची कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहे. येथे ईसीजी मशनरीची कमतरता आहे. त्यातच उपलब्ध असलेल्या मशनरीही बंद आहे. त्यामुळे सदर मशीन दुरुस्त करावी, तसेच आमदार निधीतून येथे दोन मशनरी 24 तासात तर 4 मशनरी महिण्याभरात उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. रुग्णालयात नादुरुस्त असलेली अॅटोक्लेव्ह मशीन तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या आहे.
रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलांना 2 ते 3 हजार रुपयांची औषधी बाहेरुन आणायला लावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले असुन या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयात आवश्यक औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा असा प्रकार यापुढे घडणार नाही. याची काळजी घेत औषधसाठा विभाग आणि डॉक्टर यांच्यात योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देशही यावेळी आ. जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही ही बाब लक्षात येताच सोमवार पासुन रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करा अशा सुचना त्यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या वैद्यकीय मदत विभागाला केल्या आहे. त्यानुसार सोमवार पासुन प्रत्येक वार्डात प्रत्येकी पाच अशा एकुन 100 पिण्याच्या पाण्याच्या कॅन उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
रुग्णालयात स्वच्छता ठेवा, ब्लड बॅंकचा बंद असलेला टेलीफोन तात्काळ सुरु करा, रुग्णांशी सौजन्यपुर्ण वागा, अशा सूचनाही आ. जोरगेवार यांनी केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, राशेद हुसेन, युवती प्रमुख तथा वैद्यकीय विभाग सदस्य भाग्यश्री हांडे, विलास वनकर, बबलु मेश्राम, सतनाम सिंह मिरधा, यंग चांदा ब्रिगेडच्या वैद्यकिय विभागाचे सदस्य राहुल खाडे आदिंची उपस्थिती होती.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793