थोरल्याने आई -वडिलांना घराबाहेर काढलं, धाकट्याने जिवंतपणीचं स्मशान दाखवलं;वर्ध्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

0
62

वर्धा : ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना खांद्यावर बसवून अख्ख जग दाखवलं त्याच मुलांना आज आपले आई-वडिल जड वाटू लागले आहेत. वर्ध्यामध्ये चक्क पोटच्या गोळ्याने आपल्या वृद्ध आईवडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत नेऊन सोडले आहे. वृद्ध वडिलांना पॅरिलीसिसमुळे नीट चालताही येत नाही तर आईला नीट बोलता येत नाही अशा अवस्थेत मुलाने स्मशानभूमीतील मृतदेह जाळण्याच्या शेडमध्ये नेऊन ठेवले. या धक्कादायक घटनेने संताप व्यक्त करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
महादेव अलाट (वय 85) त्यांच्या पत्नी मंजुळा अलाट (वय 68) वृद्ध दाम्पत्य मुळचं वर्धा जिल्ह्यातलं आहे. महादेव अलाट हे रेल्वे खात्यातील निवृत्त कर्मचारी आहेत.
अनिल आणि सुनील ही त्यांची दोन मुले आहेत. पण पंख फुटल्यावर जसं पाखरं उडून जातं,तशी यांची दोन पोरंही यांच्यापासून दूर गेली. थोरल्या पोरानं आई-वडिलांना घरातून बाहेर काढलं तर धाकट्यानं स्मशानात सोडून पळ काढला. हा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय महिला परिषदेच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनास आला.
राष्ट्रीय महिला परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विचारपूस केली तेव्हा वृद्ध दाम्पत्याने सांगितलेलं वास्तव सांगितले. त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं व लहान मुलगा त्यांना ओढत स्मशानभूमीत घेऊन आला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी या वृद्ध दाम्पत्याच्या हक्कांसाठी थेट पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना मुलाला समज दिली.

पोलिस परत त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले. तेव्हा घराला कुलूप होतं. कुलूप तोडून घरात गेले तेव्हा कार्यकर्ते आणि पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. मोठ्या मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांचे कपडेसुद्धा जाळून टाकले होते. हिंदू धर्मानुसार आई-वडिलांचं निधन झाल्यावर त्यांचे कपडे जाळले जातात. मात्र इथं परिस्थिती वेगळीच होती. आईवडिल जिवंत असताना मुलांनी हे कृत्य केलं आहे. वृद्ध वडिल हे रेल्वे विभागात एका टँकरवर ड्रायव्हर होते अशी माहिती आहे. निवृत्तीनंतर त्यांना पेन्शनही मिळत आहे. अशा परिस्थितीसुद्धा मुलांनी त्यांचा मानसिक व आर्थिक छळ करून त्यांना घराबाहेर काढून दिलं. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय महिला परिषद आणि पोलिसांच्या मध्यस्तीमुळे पुन्हा एकदा यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालंय

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here