मुक्तीसंदेश ज्योत यात्रेचे भाजपाने केले स्वागत

0
42
पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य

ब्रिटिश काळात विधवा,दिव्यांग व गरीबांसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती यांच्या स्मृती वर्षाप्रित्यर्थ मद्रास येथून निघालेल्या मुक्तीसंदेश ज्योत यात्रेचे शनिवार 27 ऑगस्टला चंद्रपूर येथे गिरनार चौकात आगमन झाले.यावेळी यात्रेत सहभागी पेस्टर्स(इसाई धर्मगुरू)चे लोकनेते ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे पुष्पगुच्छ व गुलाब देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने महानगर महासचिव सुभाष कसंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,माजी उपमहापौर राहुल पावडे,रुद्रनारायण तिवारी,विशाल निंबाळकर,धनराज कोवे,रामकुमार अकापेलीवार,रेणुका घोडेस्वार,डॉ.दीपक भट्टाचार्य,रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवर,आकाश मस्के,अखिलेश रविदास,मोनिशा महातव,चांद भाई,राकेश बोमनवार,भास्कर कलवल,प्रवीण उरकुडे,विक्की मेश्राम,गणेश रेगुंडवार,साजिद पठाण,रामजी यादव,अमन वाघ यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना ब्रिजभूषण पाझारे म्हणाले,पंडिता रमाबाई यांचे कार्य फार मोठे होते.त्यांनी सतीप्रथे विरुद्ध आवाज बुलंद करीत अनेक महिलांना संरक्षण दिले.पवित्र मूळ बायबलचे अनेक भारतीय भाषेत भाषांतर करून त्यांनी भाषेवरील प्रभुत्व सिद्ध केले.ब्रिटिशांनी त्यांना कैसर ए हिंद उपाधी दिली.विदेशात त्यांनी संस्कृत शिकविल्याने त्यांना सरस्वती उपाधी देण्यात आहे.देशातील कर्तृत्ववान महिलेचा आदर करीत शक्य असेल त्यांनी या मुक्तीसंदेश ज्योत यात्रेत लोकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना पास्टर अनुराग निर्मल यांनी पंडिता रमाबाई यांना भारतरत्न बहाल करावे अशी मागणी केली.कार्यक्रमाचे संचालन धनराज कोवे यांनी तर रवींद्र गुरनुले यांनी आभार मानले.या मुक्तीसंदेश ज्योत यात्रेत मद्रास येथून ज्योत घेऊन धावणारे ॲलेक्स बेन, सार्थक नगराळे ,इम्बराज जितेंद्र वैद्य पास्टर अनुराग निर्मल,राजू गुणगंटीवार विजय अरणकोंडा, प्रतीक परागी, रोशन तिरसुडे, रवी गुणगंटीवार ,राजू कन्नोरी हानोक दिकोंडा, हनोक शेंद्रे,राजकुमार,येमुरलेवार श्रीनिवास राव यांचा समावेश होता

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here