जागतिक स्ट्रेनग्यथलिफ्टिंग स्पर्धेत चंद्रपूरच्या मोसीन बानो ची सुवर्ण कामगिरी

0
46

चंद्रपूर- दरवर्षी विविध देशात आयोजित होणारी जागतिक स्ट्रेनग्यथलिफ्टिंग स्पर्धा 2022 यंदा किरगिस्तान या देशात आयोजित करण्यात आली होती .
या स्पर्धेत भारतासहित अनेक आशियाई देशांनी सहभाग घेतला होता . किरगिस्तान देशात 9 वी जागतिक स्ट्रेनग्यथलिफ्टिंग व इन्कलाईन बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्ट्रातून चंद्रपुरातील 65 किलो वजनगटातून मोसीन बानो यांनी सहभाग घेतला . सिनियर वूमन या गटात मोसीन बानो यांनी इन्कलाईन बेंचप्रेस स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले . तसेच स्ट्रेनग्यथलिफ्टिंग स्पर्धेत मोसीन यांनी 300 किलो वजन उचलत रौप्य पदक प्राप्त केले . कर्लिंग या प्रकारात मोसीन यांनी 40 किलो वजन उचलत नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला . तसेच नागपूर जिल्ह्यातील महेश सावरकर यांनी 85 किलो वजनगटातून 450 किलो आणि इन्कलाईन या स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here