घटस्थापनेनंतर माता महाकाली महोत्सवाचे उद्घाटन
- चंद्रपूरच्या सर्वसमावेशक विकासात पुरातत्व विभाग अडचण ठरत आहे. हि वस्तुस्थिती आहे. मात्र आमदार किशोर जोरगेवार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पुरातत्व विभागाच्या अटींबाबत केंद्र सरकारशी समन्वय साधत आमदार किशोर जोरगेवार यांचा माता महाकाली मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प पुर्ण करतील असा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.
आज पासुन श्री माता महाकाली महोत्सवाला सुरवात झाली आहे. सराफा असोशिएशनद्वारे देण्यात आलेली मातेची चांदीची मुर्ती पालखी मधुन माता महाकाली मंदिरात नेण्यात आली. येथे घटनस्थापना झाली त्यानंतर सदर महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, उपाध्यक्ष सुनिल महाकाले, सचिव अॅड. विजय हजारे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, सराफा असोशिएशनचे अध्यक्ष भरत शिंदे, नितीन मत्ते, माहुरगडचे देवी भागवत कथा वाचक बाळु महाराज, मनिष महाराज, वंदना हातगावकर, पंकज गुप्ता आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना ना. संजय राठोड म्हणाले कि, शिंदे सरकार स्थापण होताच राज्यातील सण उत्सवावर लादण्यात आलेले निर्बंध सरकाने उठविले. त्यामुळे आज सर्वधर्मीय सण उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरे होत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजित हा महोत्सवात धार्मिक आणि सामाजिक बांधीलकी जपली जात आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ संदेश देण्यासाठी उत्सवादरम्याण जन्मास येणाऱ्या कन्यांना चांदीचा सिक्का महोत्सव समितीच्या वतीने दिल्या जात आहे हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातुनही या महोत्सवात महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. या महोत्सवात चिंतन मंथन होणार आहे. येथील विकासासाठी पैसा आला मात्र पुरातत्व विभागाची अडचण निर्माण झाली आहे. मात्र हि अडचण दुर करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न असणार असुन यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारशी संपर्क साधतील असे ते यावेळी म्हणाले.
माता महाकाली महोत्सव जिल्हाचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतीक महत्व राज्यात पोहचवेल – आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर जिल्हाला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतीकरित्या मोठे महत्व आहे. गोंड राजाच्या या जिल्हात गोंड कालीन शिल्पकलेचा नमुना दर्शविणारे अनेक वास्तु आहे. राज्यभरात मोठ्या संख्येने भक्त असलेली चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली येथे विराजमान आहे. जिल्हाला धार्मिक पंरपरा लाभली आहे. मोठ मोठ्या सामाजिक चळवळ या जिल्हात उभ्या राहिल्या आहे. चंद्रपूरचा हाच गौरवशाली इतिहास आणि पर्यायाने जिल्हाचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यात पोहचेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलतांना केले.
यावेळ ते म्हणाले कि, चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची पालखी यात्रा निघावी अशी जुनी ईच्छा होती. चंद्रपूर मतदार संघातुन आमदार म्हणुन निवडणून आल्यावर हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले. आज हा संकल्प पूर्ण होत आहे. याचा आनंद आहे. हा महोत्सव चंद्रपूरातील पंरपरा बनणार आहे. यात कधीही खंड पडणार नाही असा माझा विश्वास आहे. या महोत्सवाच्या माध्यमातुन चंद्रपुरचा पर्यटनदृष्याही विकास होणार आहे. अर्थव्यवस्थेवरही याचा नक्कीच परिणाम होईल. रोजगार निर्मीती होणार आहे. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा हा माझा संकल्प आहे. यासाठी पहिल्या टप्यातील ५9 कोटी रुपयांचा निधी आहे. तर आपण वाढीव निधीची मागणी करुन दुसऱ्या टप्यात 75 कोटी रुपये मिळवून देत आहोत. यावरच न थांबता मातेची यात्रा भरते त्या जागेवरही विकास व्हावा या करिता आपण तिसऱ्या टप्यातही निधीची मागणी करणार आहोत. या कामात पूरातत्व विभागाच्या अडचणी येत आहेत. मात्र शिंदे सरकार त्या सोडविण्याच्या दिशेने प्रयत्नशिल असल्याचे ते यावेळी म्हणाले. महाकाली महोत्सवाचे भव्य अश्या आयोजनाचे केवळ 16 दिवसात नियोजन करण्यात आले. यात अनेक संस्थांन व माता महाकाली भक्तांचा सक्रिय सहभाग लाभला त्यांचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आभार मानले.
यावेळी बोलतांना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस म्हणाल्या की, रणांगणात लढणारी शक्तीची देवता म्हणून माता महाकालीची ओळख आहे. राक्षसांचा नाश करून शांती प्रस्थापित व्हावी यासाठी माता महाकाली आणि दुर्गेने अवतार घेतला होता. तेव्हा पासुन आजही जेव्हा कधी संकट येते कोणत्यातरी रुपात दुर्गा प्रकट होत असते. धर्म, धार्मिकता यांच्याशी महिलांचे अटुत नाते असुन धर्म टिकवून ठेवण्यात महिलांची मोठी भुमिका राहिली असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी नवरात्रोत्सवा दरम्यान जन्मास आलेल्या कन्यांच्या पालकांना मान्यवरांच्या हस्ते चांदीचा सिक्का भेट स्वरुपात देण्यात आला. त्यानंतर 11 वाजता माहुरगड येथील प्रसिध्द बाळु महाराज यांच्या श्रीमद् माता महाकाली देवी भागवत कथेला सुरवात झाली. दुपारी 2 वाजता माता महाकाली सेवा समितीच्या वतीने आत्मनिर्भर दुर्गा यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक माता महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल यांनी केले. तर माता महाकाली सेवा समितीचे सचिव अॅड विजय हजारे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. श्याम हेडाऊ आणि सरोज चांदेकर यांनी सुत्र संचालन केले.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793