पायली येथील 25 वर्षीय तरुणीला जीवनदान देण्याचा मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रयत्न..

0
89
कु सुषमा रायपूरे ही पायली या गावातील उच्च शिक्षित युवती घरची परिस्थिती अतिशय हलाखीची अशा परिस्थितीत चांगले शिकूण आपल्या घरची परिस्थिती बदलावी असा विचार कदाचित तिच्या मनात असावा. मात्र कदाचित नियतीला काही हे मान्य नव्हते. अचानक काही महिन्यांपूर्वी तिची दृष्टी अधू होत गेली. म्हणून उपचार सुरू केले.  ह्या उपचाराची सुरुवात पाठीच्या शस्त्रक्रियेपासून झाली. त्यानंतर मेंदू, नाक यांची शस्त्रक्रिया आणि नंतर काही कारणांमुळे झालेला अर्धांगवायू (paralysis). आणि नंतर  तिला ब्रेनट्युमर , कॅन्सर असल्याचे माहीत झाल्यावर मात्र तिचे सर्व कुटुंब हतबल झाले. कारण आता तिच्यावरील उपचार  त्यांच्या आवाक्या बाहेर होता. काय करावे? कसे करावे? असे प्रश्न त्यांच्या समोर उभे होते मात्र उत्तर काही सापडत नव्हते. तिला उपचारासाठी  मदत मिळविण्यासाठी गावकरी, नातेवाईक आपापल्या परीने प्रयत्नशील होते. थोडीफार मदत मिळतही होती पण ती नक्कीच पुरेशी  नव्हती. मात्र नंतर ही बाब मा. रोशनी अन्वर खान मॅडम माजी सभापती जी. प. चंद्रपूर यांना जिल्हा परिषद शाळेतील सहा. शिक्षिका सौ. अंजलीना साळवे यांच्या द्वारे कळली. आणि लगेच रोशनी खान मॅडम यांनी रामपाल भैया सिंग भारतीय जनता पक्षाचे नेते जिल्हा उपाध्यक्ष यान्हा याबाबत अवगत केले व ते सुषमा रायपुरे ईच्या घरी जाऊन विचारपूस केली , आर्थिक मदत केली.
यासंपूर्ण परिस्थीती बद्दल रामपाल भैया यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना अवगत केले. आणि मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार जी यांनी तात्काळ तिच्या उपचारासाठी भाऊ यांच्या कार्यालयातील आरोग्य सेवा सांभाळणारे  श्री.सागर खडसे सर यांना संपूर्ण मेडीकल संबंधी माहिती घेण्यास पायली गावात पाठवले. सुधीर भाऊ यांनी  आवश्यक तो सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली.  जणूंकाही आता ती नक्कीच बरी होईल अशी आशाच कुटूंबियांना मिळाली आहे . लगेच मुंबई येथील BOMBAY HOSPITAL AND RESEARCH CENTRE या  दवाखान्यात तिचा उपचार करायाला AMBULANCE करून तिला तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली.   इतकेच नाही तर तिच्या सोबत मुंबईला जाणाऱ्या वडील आणि बहिणीची सुद्धा आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली. विकास कामासाठी प्रसिद्ध असलेल्या मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा अनुभव परिसरातील नागरिकांनी अनुभवला.
यासंपूर्ण कार्यात  मा. रामपाल भैया  सिंग जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर , मा. रोशनी अन्वर खान माजी सभापती महिला व बालकल्याण समिती जी. प. चंद्रपूर, मा. राकेश गौरकार सरपंच ग्रामपंचायत पायली- भटाळी, मा. नदीम रायपुरे, सदस्य ग्रामपंचायत पायली-भटाळी जि.प. शाळा, पायली येथील मुख्याध्यापक श्री निखिल तांबोळी  , शिक्षिका अंजलिना साळवे तसेच गावातील युवा वर्ग यांचे प्रामुख्याने सहकार्य लाभले.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here