आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजित चार दिवसीय माता महाकाली महोत्सव यशस्वी झाला आहे. या महोत्सवा निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्वात मोठी माता महाकालीची शोभायात्रा काढत नवा पायंडा घातला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नरेशबाबु पुगलिया यांनी केले.
माता महाकाली महोत्सव समितीच्या पेंडालात माजी खासदार नरेशबाबु पुगलिया यांच्या हस्ते माता महाकाली ची आरती करण्यात आली. या आरती कार्यक्रमा नंतर ते बोलत होते. या कार्यक्रमात 999 कन्यांना भोजन दिल्या जात आहे. महोत्सवासाठी सराफा असोशिएशनने आठ किलो चांदीची माता महाकालीची मुर्ती दिली आहे. याबदलही पुगलिया यांनी सराफा असोशिएशनचे कौतुक केले. आमदार किशोर जोरगेवार माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. या विकासकामासाठी ते दुस-र्या टप्यात 75 कोटी रुपये उपलब्ध करुन देत आहे. तर यात्रा पटांगणाच्या विकासासाठी ते तिस-र्या टप्प्याच्या निधीचीही मागणी करणार आहे. या चांगल्या कामासाठी त्यांनी पूढकार घेतला असल्याचे ते यावेळी म्हणाले. माजी खासदार नरेशबाबु पुगलिया यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणीक आणि धार्मीक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. महोत्सव संपन्न होत असलेले हे पटांगण न्य इग्लीश शाळेचे आहे. हे पटांगण त्यांनीच उपलब्ध करुन दिले असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793