महाकाली महोत्सवात रुग्ण सेवा करणाच्या सामाजिक हेतूने रोटरी क्लबच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसीय या आरोग्य शिबिरात जवळपास दोन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर निशुल्क औषधोपचार करण्यात आला आहे. यात रोटरी क्लबच्या डॉ. आसावरी देवतळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समुउपदेशक राखी देशमुख, रूपाली मडावी, कौसर खान, प्रीती निकोडे आदींनी सहकार्य केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून माता महाकाली सेवा समितीच्या वतीने आयोजित चार दिवसीय श्री. माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला धार्मिक, सांस्कृतिक यासह सामाजिक स्वरूप प्राप्त होण्यासाठी माता महाकाली महोत्सवा दरम्यान आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले होते. यावेळी अनेक आजारांवर तापसणी करत प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच यावेळी निशुल्क औषधोपचार करण्यात आले. माता महाकालीच्या दर्शनासाठी आलेल्या जवळपास दोन हजार नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793