चंद्रपूर :- शहरात मागील नऊ दिवसांपासून खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत भाऊचा दांडिया सुरू आहे. काल नवमीच्या रात्री खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दांडिया नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमदार प्रतिभा धानोरकर गाण्यावर नृत्य करत असल्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गाण्यावर चांगलाच ठेका धरला. व्हिडीओमध्ये त्या महिलासोबत नृत्य करताना दिसत आहेत.
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोकर आणि वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहरातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवून दांडियाची शोभा वाढवली. काल नवमीच्या रात्री खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दांडिया नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर सहभागी झाल्या होत्या.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793