शुक्रवार दिनांक 21 अक्टूबर 2022 रोजी शहाराध्य रविकुमार पुप्पलवार जी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष अफझल अली जी यांच्या नेतृत्वात उप-मुख्याधिकारी जयवंत काटकर यांना निवेदन देण्यात आले, 2019-20 या कालावधीमध्ये बल्लारपूर शहरामध्ये MJP चे शहरात नवीन पाईपलाईन टाकण्याचे कार्य करण्यात आले होते, त्याकरिता रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले होते, या कार्यास जवळ जवळ तीन वर्ष लोटल्यानंतर सुद्धा त्या खोदलेल्या गड्ड्यांचे जीर्णोद्धार अजूनही करण्यात आलेले नाही. अश्या अपूर्ण कार्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, शहरातील जीर्णोद्धार चे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास आणावे. अन्यथा या मागणीसाठी आम आदमी पक्षाला आंदोलनाचा देखील विचार करावा लागेल.
या वेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफझल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, युवा अध्यक्ष सागर कांबळे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, संघटन मंत्री सरिताताई गुजर व किरनताई खन्ना, वस्ती विभाग चुनाव प्रभारी प्रा. प्रशांत वाळके जी इत्यादी उपस्थित होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793