“आप” चे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनात आदमी पक्षाच्या CYSS या विद्यार्थी संघटनेचे शहर उपाध्यक्ष आशिष गेडाम यांनी नगर परिषदेच्या शौचालयांची पोल खोल केलेली आहे. बल्लारपूर शहरात नगरपरिषद तर्फे 2018 साली एकूण 19 शौचालये बांधली गेली आहेत. या शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी एका महिला बचत गटाकडे आहे. परंतु या शौचालयांची अवस्था अतिशय दुर्धर असल्याचे आशिष गेडाम यांनी निदर्शनास आणून दिले आहे. आम आदमी पक्षाने नगरपरिषद अधिकाऱ्यांकडून जेव्हा शौचालयांची माहिती घेतली तेव्हा ती शौचालये 70-80% स्वच्छ आहेतच असे अधिकाऱ्यांनी ठासून सांगितले मात्र परिस्थिती तर वेगळीच आहे. शौचालयांची अवस्था अशी आहे की नागरिक त्यांचा वापर सुद्धा करू शकत नाहीत. अपंग व्यक्तींसाठी सुद्धा सुविधांचा अभाव आहे. शौचालयांमध्ये पाण्याचा अपव्यय होत आहे. शौचालयांची अवस्था सुधारली गेली नाही तर पक्षातर्फे आंदोलन केले जाईल असा इशाराही आशिष गेडाम यांनी दिला.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793