भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी पार्टी आहे. पक्ष देशामध्ये तळागाळामध्ये पोहचलेला असून पक्षाचे विचार व कार्यशैली सर्वमान्य झालेली आहे. शेवटच्या व्यक्तीचा विकास हा केंद्र बिंदू ठरवून विकासाची गंगा सर्व क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वृध्दींगत होते आहे. त्यामुळे व विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांचे कार्य व विचार सर्वांना मनोमन पटत आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, वने, मत्स्यव्यवाय मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर महानगरातील ऑटोरिक्षा चालक-मालक, एमआयडीसी व मेडीकल कॉलेजमधील शेकडो कामगार वर्गाने श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण देवराव भोंगळे, भाजपा शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, रविंद्र गुरनुले, प्रकाश धारणे, राहूल पावडे, अंजली घोटेकर, विशाल निंबाळकर, अरुण तिखे, संदिप आगलावे, विठ्ठल डूकरे, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, प्रभा गुडधे, किरण बुटले, छबुताई वैरागडे, सविता कांबळे, अजय सरकार, उमेश आष्टनकर, राकेश बोमनवार, रामकुमार आक्कापेल्लीवार, धम्मप्रकाश भस्मे, रुद्रनारायण तिवारी, अजय दुबे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
नवप्रवेक्षित भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रामुख्याने सुरज सिंग, संतोष मैसा, संपत इरगुर्ला, आकाश दुर्योधन, विजय रामटेके यांचे सोबत शेकडो कामगारांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला. नवप्रवेक्षित भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजपाचे संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी नवप्रवेक्षित भाजपा कार्यकर्त्यांचे दुप्पटे प्रदान करुन त्यांनी स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राजेंद्र खांडेकर, नितीन कारीया, अमित निरंजने, सुरज पेदुलवार, चांदभाई पाशा यांनी अथक परिश्रम घेतले.