लोकनेते, विकास पुरुष तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत दिनांक 25/11/2022 ला चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत दिघोरी येथील सरपंच वनिता ताई वाकूडकर, उपसरपंच शंकर वाकूडकर, सदस्य पंढरी आवारी, श्रीमता भक्तादास वाकूडकर, प्रेमिला मडावी असे 7 पैकी 5 ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे सरकार असतांना भुलताप देऊन सरपंच निवडणूक जिंकली परंतु त्यानंतर त्या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. गावातील विकासकामांकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे शिवसेवा नेत्यांचे आश्वासनही खोटे ठरले. त्यामुळे फक्त पक्ष म्हणून पक्षात राहा, गावातील विकास कामे नाही झाले तरी चालेल अशी शिवसेनेच्या नेत्यांची भावना असल्यामुळे अनेक गावांच्या तुलनेत दिघोरी हे गाव विकासापासून दूर राहिले अशी खंत यावेळी सरपंच आणि उपसरपंच यांनी व्यक्त केली. आम्हाला आमच्या कार्यकाळामध्ये गावातील जास्तीत जास्त विकास कामे करायची आहे आणि ती फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहिल्यानेच ते पूर्ण होऊ शकतात असा आशावाद ग्रामपंचायत कमिटीने व्यक्त केला. या पक्षप्रवेशा वेळी मा. देवराव भोंगळे जिल्हाध्यक्ष, भाजपा चंद्रपूर, कु. अल्का आत्राम जिल्हाध्यक्षा भाजपा महिला आघाडी, ओमदास पाल, विनोद देशमुख, अजय मस्के, राहुल पाल, वैभव पिंपळशेंडे, आदित्य तुम्मुलवार, विशू भाकरे, रणजित पिंपळशेंडे, भगवान पाल, धर्माराव मेश्राम, शंकर बोरीकर, उमेश राऊत, ओमदेव देशमुख, बाळू वाकूडकर, भक्तदास वाकूडकर, रामचंद्र भोपये इत्यादी तसेच भाजपा प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*