आम आदमी पार्टी बल्लारपूरने वार्डातील अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधले.

0
40

सोमवार दिनांक 05/12/2022 रोजी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अफजल अली यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद बल्लारपूर चे मुख्याधिकारी वाघ साहेब यांना निवेदन देण्यात आले, शिवनगर वार्डात,मौलाना आझाद वार्डात काही ठिकाणी पथदिव्याचे खांब नसल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना ये-जा करताना त्रास होतो, त्याचप्रमाणे पंचशील चौक, विद्यानगर वार्डातील नालीवरील तुटलेल्या पुलामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, अनेकवेळा वाहने नाल्यात पडण्यापासून वाचली तसेच कल्लूरवार हॉस्पिटलजवळ दोन मोकाट कुत्रे फिरत आहेत, त्यामुळे नागरिक परेशान झाले आहेत, वरील सर्व समस्यांकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आणि समस्या सोडविण्यात यावी असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले.
यावेळी शहर उपाध्यक्ष अफजल अली जी, सचिव ज्योतीताई बाबरे, शहर महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, संयोजिका सरिता गुजर, CYSS सहप्रमुख आशिष गेडाम, सुधाकर गेडाम, बेबीताई बुरडकर आदी क्रांतिकारी साथीदार उपस्थित होते.

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here