आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता मुलांमुलींची निवड

0
67

 

चंद्रपूर जिल्हयातील चालत असलेले सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह येथील मुलांमुलींनी उत्कृष्ट कराटे प्रशिक्षण प्राप्त केले. त्यांच्या कलागुणांना बघून त्यांची पुणे येथे होणारी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. असून सदर प्रशिक्षण सामाजिक न्याय विभागाचे मा. सहायक आयुक्त, अमोलजी यावलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनातील अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड येथील मुख्याध्यापिका श्रीमती बबिता हुमने मॅडम तसेच श्रीमती अनिता वानखेडे मॅडम यांच्या मार्गदर्शनातील वरील कराटे पटु आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता पुणे येथे रवानगी करण्यात आले. तेव्हा मुलांचे क्रीडामार्गदर्शक व ज्युडो कराटे प्रशिक्षक सोमेश्वर येलचलवार, सेन्साई ज्योती माणूसमारे, वाहुल गौरकार, सेन्याई कुदन पेंदोर यांच्या मार्गदर्शनातील विद्यार्थ्यांनी आपल्या ज्युडो कराटेचे प्रशिक्षण केले असून अश्या प्रकारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग च्या वतीने पहिल्यांदाच जिल्हयातील सदर प्रशिक्षण सुरु करण्यात आले. व मोठ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता मुलांमुलींची निवडउत्साहाने विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला बघून पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुभाषचंद्र बोस मिलिटरी हाय. पुलगाव पुणे दि. 26, 27 डिसेंबर 2022 ला वरील स्पर्धा होत आहे. तेव्हा जिल्ह्यातून 50 मुलांमुलींनी भाग घेतलेला आहे. वरील स्पर्धेतील भाग घेणारे विद्यार्थ्यांचे नावे वरील विस्तृत माहिती मुलांची शासकीय निवासी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता मुलांमुलींची निवडशाळा, भिवकुंड येथील शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती बबिता हुमने यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

(श्रीमती बबिता ए. हुमने) मुख्याध्यापक अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर

9552939314

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here