**वन तथा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन**

0
37

 

*श्री कन्यका परमेश्वरी देवस्थान ट्रस्टतर्फे उपवर-वधू मेळाव्याचे आयोजन*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*आपल्या प्रगतीसोबतच, सर्व समाजाच्या प्रगतीसाठी आपले योगदान असावे*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चंद्रपूर :* आपल्या प्रगतीसोबतच, सर्व समाजाच्या प्रगतीसाठी आपले योगदान असावे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. श्री कन्यका परमेश्वरी देवस्थान ट्रस्टतर्फे उपवर-वधू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार समीर कुणावार, श्रद्धा कुणावार, मिलिंद कोतपल्लीवार, संदीप पोशेट्टीवार, राजेश्वर चिंतावार, सपना मुनगंटीवार, प्रशांत कोलप्याकवार, तन्मय बिडवई, अजय मामीडवार, उदय बुद्धावार, राजेश्वर सुरावार, महेश कल्लुरवार, श्रीराम झुल्लूरवार, गिरीधर उपगन्लावार, अमित कासनगोट्टवार उपस्थित होते. ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी ‘वाट सहजीवनाची’ या स्मरणिकेचे ही प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, 1990 मध्ये आपण उपवर वधू मेळाव्याचे अध्यक्ष आणि उपवरही होतो. 1990 ते 2023 या काळात समाजात बरेच बदल झाले. परंतु आजही 1990 च्या मेळाव्यातील स्मृती ताज्या होतात. मेळाव्यात उपवर आणि उपवधूंचे दोन स्वतंत्र पुस्तके काढण्यात आली आहेत. त्यातील उपवधूंची संख्या ही चिंतन करायला लावणारी आहे. समाजात मुलींची कमी होत असलेली संख्या ही चिंतेची बाब असून यावर चिंतन आणि उपाय करण्याची गरज आहे. योग्य विचाराअंती घेतलेला निर्णय व्यक्तीचे जीवन बदलतो. त्यामुळे आपण प्रत्येक उपवर-वधुला अपेक्षेनुरूप जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करतो. उपवर वधू मेळावा म्हणजे एक प्रकारचे स्नेहमिलनच आहे. या मेळाव्यांमध्ये उपवर वधुसंशोधन तर होतेच, परंतु सर्व समाज बांधवांचे एकमेकांशी परिचय ही होतो. श्री कन्यका परमेश्वरी देवस्थान ट्रस्टने आजपर्यंत केलेले कार्य उत्तम आहे, असे गौरवोद्गार मुनगंटीवार यांनी काढले.

श्री कन्यका परमेश्वरी देवस्थान ट्रस्टने समिती किंवा उप समितीच्या माध्यमातून चंद्रपुरातील संपूर्ण समाजाला एक छत्राखाली आणण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. समाजातील गरीब आणि गरजू परिवारांना उपवर वधू मेळाव्यांमध्ये विनामूल्य प्रवेश दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. व्यक्ती व्यक्तींपासून समाज बनतो. आपला समाज हा स्वतःची रेष मोठी करून विकास करणार आहे. समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्यही आपल्याला करायचे आहे, असेही ना.मुनगंटीवार म्हणाले. कार्यक्रमाला श्री माता कन्यका परमेश्वरी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, सभासद आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~==

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here