* नारीशक्‍तीला प्रतिष्‍ठा देणा-या स्‍त्री कर्तृत्‍वाचा सन्‍मान करणा-या मोदी सरकारचे, शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन – शिल्‍पा पाचघरे *

0
40

======================

* सावित्रीबाईच्‍या लेकींचे सक्षमीकरणाचे स्‍वप्‍न साकार करणा-या मा. मोदीजी आणि शिंदे-फडणवीस सरकार यांचे अभिनंदन – सौ. अंजली घोटेकर *.
============================

मा. प्रदेशाध्‍यक्ष चित्राताई वाघ यांचे सुचनेनुसार तसेच मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि चित्राताई वाघ यांच्‍या मार्गदर्शनात तसेच प्रदेश कार्यकारीणी उपाध्‍यक्ष मा. शिल्‍पा पाचघरे जिल्‍हा महानगर समन्‍वयक चंद्रपूर यांचे प्रमुख उपस्थितीमध्‍ये चंद्रपूर महानगरची जिल्‍हा बैठक संपन्‍न झाली. ही बैठक जिल्‍हाध्‍यक्ष अंजली घोटेकर यांच्‍या नेतृत्‍वात घेण्‍यात आली. यावेळी मंचावर शिल्‍पा पाचघरे, अध्‍यक्षा अंजली घोटेकर, महामंत्री शिला चव्‍हाण, महामंत्री प्रज्ञा बोरगमवार, भाजपा उपाध्‍यक्ष डॉ. भारती दुधानी यांची उपस्थिती होती.

=======≠=====≠==≠=======

राजमाता मॉ जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्‍मीबाई, सावित्रीबाई फुले आणि दिनदयाल उपाध्‍यायजी यांना माल्‍यार्पण आणि नमन करून बैठकीची सुरूवात करण्‍यात आली. त्‍यानंतर मा. शिल्‍पा पाचघरे यांचे पुस्‍तक आणि रेशमी शेला देवून स्‍वागत करण्‍यात आले. यावेळी प्रास्‍ताविक करताना जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर म्‍हणाल्‍या की, देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी महिलांच्‍या प्रगतीकरिता व सक्षमीकरणाकरिता अनेक योजना निर्माण केल्‍या. ज्‍यामध्‍ये बेघरांना घरे, घर-घर शौचालय, हर नल जल, उज्‍वला गॅस, आयुष्‍यमान भारत आणि इतर १२५ योजना समाविष्‍ट आहे आणि त्‍या राबविण्‍यासाठी पूर्ण देशातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकांपर्यंत या योजना पोहचावून त्‍यांचा लाभ लोकांना देण्‍यासाठी काम करीत आहेत. महाराष्‍ट्र शासनामार्फत सुध्‍दा या सर्व योजना घराघरात पोहचविण्‍यासाठी कार्यकर्ते काम करीत आहेत आणि म्‍हणूनच पुणे येथे झालेल्‍या प्रदेश कार्यकारीणीच्‍या बैठकीत याबाबत महिला मोर्चातर्फे अभिनंदनाचा प्रस्‍ताव पारित करण्‍यात आला आहे. आजच्‍या या जिल्‍हा बैठकीत देखील महानगर चंद्रपूर महिला मोर्चातर्फे अभिनंदनाचा ठराव ठेवून एकमताने तो पारित करण्‍यात आला. चंद्रपूर येथील भाजपा महिला मोर्चाची कार्यकारीणी पक्षवाढीकरिता आणि या सर्व योजना घराघरात पोहचविण्‍याकरिता एक दिलाने आणि एक मताने कार्य करीत आहे. पिडीतांना न्‍याय देण्‍याकरिता रस्‍त्‍यावर उतरून आंदोलने करीत आहेत. यावेळी मा. शिल्‍पा पाचघरे यांनी मार्गदर्शन करताना महिला मोर्चाचा, शक्‍ती केंद्राचा, पांचही मंडळांचा आढावा घेतला. पक्षाच्‍या माध्‍यमातुन धन्‍यवाद मोदीजी पत्र, फ्रेन्‍ड्स ऑफ बीजेपी नोंदणी, व्‍टीटर, फेसबुक, व्‍हॉट्सअॅप ओपन करणे, नवमतदार नोंदणी करणे यासाठी महिला मोर्चाने सक्रीय राहीले पाहीजे असे सांगीतले. मा. मोदीजी यांनी महिलांकरिता तयार केलेल्‍या योजना तसेच मा. मुख्‍यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्‍या माध्‍यमातुन जनहिताच्‍या ज्‍या योजना आहेत त्‍या घराघरात पोहचविण्‍याकरिता आपण महिला प्रभावी माध्‍यम आहोत. आपण आपल्‍या घरचा वेळ काढून अनेक अडचणी सहन करून पक्षासाठी काम करीत आहोत, असेच काम बुथ लेव्‍हलपर्यंत झाले पाहीजे तेव्‍हाच भाजपा अधिक मजबुत होईल आणि भाजपा महिला मोर्चा देखील मजबुत होवून आपण मा. प्रदेशाध्‍यक्ष चित्राताई वाघ यांचे हात बळकट करू शकतो. यावेळी वर्षा सोमलकर मंडळ अध्‍यक्ष बंगाली कॅम्‍प, रेणुताई घोडेस्‍वार उपाध्‍यक्ष, मंजू कासनगोट्टूवार उपाध्‍यक्ष यांनीही आपण असे काम करतो हे सांगीतले. यावेळी शिल्‍पाताई पाचघरे यांच्‍याकडे सौ. अंजली घोटेकर जिल्‍हाध्‍यक्ष यांनी जिल्‍हा कार्यकारीणी, पांचही मंडळ कार्यकारीणी आणि शक्‍तीकेंद्र प्रमुखांची यादी सोपविली.

=========================

या कार्यक्रमाचे संचालन युवती प्रमुख मुग्‍धा खांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती दुधानी यांनी केले. या बैठकीला भाजपा उपाध्‍यक्ष छबू वैरागडे, महिला मोर्चा उपाध्‍यक्ष प्रभा गुडधे, विशाखा राजुरकर, रेणु घोडेस्‍वार, मंजु कासनगोट्टूवार, सचिव सिंधु राजगुरे, पुनम गरडवा, वंदना राधारपवार, नगरसेविका सविता कांबळे, माया उईके, कल्‍पना बगुलकर, वर्षा सोमलकर, शितल कुळमेथे, सिमा मडावी यांचेसह बुथ प्रमुख, शक्‍तीकेंद्र प्रमुख यांचीही उपस्थिती होती.

============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======≠==================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here