*नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते महाराष्ट्र राज्यगीताचे रविवारी लोकार्पण*

0
50

=================

* माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती * 
==========================
*छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य*  
==========================
येथील भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे रविवार 19 फेब्रुवारीला शिव जयंती उत्सवाचे आयोजन सकाळी 09 च्या सुमारास करण्यात आले असून यावेळी सांस्कृतिक कार्य,वने व मत्स्यपालन व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते ‘जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा…’या राज्यगीताचे लोकार्पण पटेल हायस्कुल समोरील शिव स्मारक येथे केले जाणार आहे.या प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत राज्य शासनाने ‘राज्यगीत म्हणून नुकतेच स्विकारले आहे.छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जयंती (19 फेब्रुवारी 23)पासून हे गीत प्रत्येक शासकीय कार्यक्रमात वाजविले किंवा गायले जाणार आहे.मागील 6 दशकापासून राज्यगीताची  मागणी प्रलंबित होती.सांस्कृतिक कार्यमंत्री  ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नातून अखेर 30 जानेवारीला मंत्रीमंडळाने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला.दि. 01 फेब्रुवारी 2023 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासकिय परिपत्रकानुसार कविवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा असे हे राज्यगीत असून,शिव जयंती पर्वावर आयोजित या ऐतिहासीक सोहळ्याचे प्रत्येकाने साक्षीदार व्हावे, म्हणून जनतेने या सोहळ्यात उपस्थित राहावे,असे आवाहन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,भाजपा नेते राजेंद्र गांधी, सुभाष कासंगोट्टुवार,प्रकाश धारणे,ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले,अंजली घोटेकर,विशाल निंबाळकर आदींनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here