=============================
*वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही*
===========================
*गोंडपिपरी,
=====================
दि. ४ :* गोंडपिपरीतील जनतेच्या प्रेमाचे कर्ज आपल्यावर आहे, त्याची व्याजासह परतफेड नक्की करू, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
==========================
गोंडपिपरी येथील माता कन्यका सभागृहात आयोजित सत्कार सोहळा व कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, तालुका अध्यक्ष बबन निकोडे, जिल्ह्याचे महामंत्री नामदेव डाहुले, महिला आघाडी अध्यक्षा अल्का आत्राम, दीपक सातपुते, अमर बोडलावार, सुहास माडुरवार, बंडू बोनगीरवार, उपविभागीय अधिकारी ढवळे, संवर्ग विकास अधिकारी माऊलीकर, तहसीलदार मडामे, चेतन गौर, प्रकाश उत्तरवार, कुसुमताई ढुमने, महेंद्र चंदेल, प्रशांत येल्लेवार उपस्थित होते.
=====================
यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणले की, गोंडपिपरीच्या जनतेने दाखविलेल्या प्रेमामुळे आपण भारावून गेलो आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम करताना स्वातंत्र्यानंतर प्रथमच महसूल सरप्लस असणारा अर्थसंकल्प सादर करण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले. अर्थसंकल्प मांडताना कर्जावरील व्याज मात्र भरावे लागते. गोंडपिपरीतील जनतेच्या प्रेमाचे कर्ज आपल्यावर आहे. त्याची व्याजासह परतफेड नक्की करू असा शब्द ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.ना.मुनगंटीवार यांचा अनेक संस्थां तसेच समाज बांधवानी सत्कार केला.
===========================
सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्य करताना महाराष्ट्राला राज्यगीत मिळावे यासाठी पुढाकार घेतला. त्याची फलश्रूती म्हणून आता महाराष्ट्राला स्वत:चे राज्यगीत प्राप्त झाल्याचा आनंद ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जनतेच्या आशीर्वादाने जीवन सार्थकी झाल्यासारखे वाटते.
१९९२ च्या कारसेवेमध्ये मला सहभागी होता आले तेंव्हापासून श्री राम मंदिराचा ध्यास घेतला होता. अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी सागवान काष्ठ समर्पित करण्याचे सौभाग्य प्राप्त झाल्याने आपल्याला मंदिराच्या निर्माण कार्यात सेवा देता आल्याचा आनंद वाटतो, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
========================
गोंडपिपरीच्या नजीक महामार्ग निर्मितीचे कार्य सुरू आहे. त्यामुळे या भागाचा निश्चित कायापालट होईल. पायाभूत सुविधा मिळाल्या की, रोजगार निर्मिती होते. मूर्ती विमानतळाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारने पूर्णतः प्रलंबित ठेवला होता, त्याला गती देण्याचे काम हाती घेतले असून लवकर या विमानतळाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. धाबा येथील श्री. संत कोंडय्या महाराज मंदिराचा विकासाचे कामही वेगाने सुरू आहे. यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भात पुढेही निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना.मुनगंटीवार यांनी दिली.येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी धाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाला सांगितले .
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*.
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793