* क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत *

0
38

=======================

* शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप  *

 ========================

क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त माळी युवा मंच व क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले असुन शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप करण्यात आले.

==========================

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, मुन्ना जोगी, हेरमन जोसेफ, चंद्रशेखर देशमुख, बादल हजारे, प्रविण कुलटे, सायली येरणे, सविता दंडारे, कल्पना शिंदे, अल्का मेश्राम, अनीता झाडे, आशु फुलझेले, वैशाली मेश्राम, निलिमा वनकर, कविता निखारे, वंदना हजारे, वैशाली मद्दीवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=========================

आज मंगळवारी क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्त माळी युवा मंच व क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळच्या वतीने शहरातुन शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी ९ वाजता बालाजी वार्डातील महात्मा फुले सांस्कृतीक सभागृहाजवळून सदर शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालया जवळ स्वागत मंच उभारण्यात आले होते. ही शोभायात्रा येथे पोहोचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी क्रांतिसुर्य ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. सदर शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

===========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here