=====================
* क्रांतिसूर्य ज्योतिबांना महानगर भाजपाने केले अभिवादन *
==============÷÷÷=====÷
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.त्याला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची साथ मिळाली.या दाम्पत्यामुळे आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे.स्त्री सक्षमीकरणाचे जनक ज्योतिबा होते.त्यांचे कडून प्रेरणा घेऊन महिलांच्या. सक्षमीकरणासाठी आणखी कार्य करण्याची गरज आहे.या पावनदिनाला स्त्री सक्षमीकरणाचा संकल्प घेऊ या,असे आवाहन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले.ते महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बहुजन समता रॅलीच्या स्वागत प्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतांना बोलत होते.या बहुजन समता पर्वा निमित्य बहुजन समता रॅलीचे आयोजन माळी युवा मंच,क्षत्रीय माळी समाज,व माळी समाज महिला मंडळ यांनी केले.
यावेळी भाजपा नेते राजेंद्र गांधी, रवींद्र गुरनुले,विनोद शेरकी, रवी लोणकर, सचिन कोतपल्लीवार, शितल गुरनुले, शिला चव्हान, प्रदीप किरमे, बाळू कोलणकर, राजू जोशी, चंदन पाल, गणेश रामगुंडेवार, सतीश तायडे, पूनम तिवारी, सुरज सरदम, मोहन मंचलवार,राजू घरोटे, दिवाकर पुद्दटवार यांची उपस्थिती होती.
======================
शोभायात्रेत सहभागींना पाणी व बिस्किटचे वाटप
महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह बालाजी वार्ड येथून निघालेली रॅली प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत गिरनार चौक येथे पोहोचल्यावर ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे घरासमोर भाजपा तर्फे स्वागत करण्यात आले.यावेळी रथावर आरूढ महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव करण्यात आला.याचवेळी रॅलीत सहभागी लोकांना बिस्कीट व पाणी भाजपाच्या वतीने वाटप करण्यात आले.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793