======================
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त शहरातुन निघालेल्या रॅलीचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी भिमसैनिकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
========================
या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन विभाग महिला शहर प्रमुख विमल कातकर, जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, शहर युवा प्रमुख कलाकार मल्लारप, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, युवा नेते अमोल शेडे, करणसिंग बैस, राम जंगम, सायली येरणे, सविता दंडारे, कल्पना शिंदे, निलिमा वनकर, माधूरी निवलकर, वंदना हजारे, सुजाता बल्ली, वैशाली मेश्राम, वैशाली मद्दीवार, सरोज चांदेकर, आशु फुलझेले, कविता निखारे, अल्का मेश्राम, गौरव जोरगेवार, दिनेश इंगळे, नितेश गवळी आदींची उपस्थिती होती.
=========================
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त संध्याकाळी शहरातील विविध भागातुन रॅल्या काढण्यात आल्यात. या रॅलींचे स्वागत करण्यासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आले होते. सदर रॅली स्वागत मंच जवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी भिमसैनिकांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793