* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिकवण सर्व समाजापर्यंत पोहोचवा- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार *

0
36

____________________________


* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व चित्रप्रदर्शनीचे लोकार्पण *

__________________________

चंद्रपूर, दि.17 : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1950 रोजी देशाला संविधान समर्पित केले. सर्वांना अधिकारासोबतच मूलभूत कर्तव्याची व विचारांची जाणीव या संविधानाच्या माध्यमातून झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची शिकवण सर्व समाजापर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

___________________________

चंद्रपूर महानगरपालिका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित चित्रप्रदर्शनीचे उद्धघाटन करतांना ते बोलत होते. यावेळी श्रध्‍देय सुमनवंतो महास्थवीर सचिव महाराष्ट्र प्रदेश भिक्षु संघटना,भंते मदन्त सघवंस थेरो चंद्रपूर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, भाजपा महामंत्री बीजभूषण पाझारे, राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, रवींद्र गुरनुले,  भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे, महिला आघाडी अध्यक्ष अंजली घोटेकर, महानगर युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर आदी उपस्थित होते.

______________________________

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हिमालयापेक्षाही उंच आहे. समता, ममता व बंधुत्वाच्या मार्गावर जात-पात व समाजाच्या बाहेर जाऊन संविधानाच्या चौकटीत आचरण, वर्तणूक व कर्तव्य पूर्ण करू, हा भाव डॉ. आंबेडकरांनी संविधान समर्पित करताना व्यक्त केला होता. प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा सन्मान करण्याची वृत्ती आपल्या अंगी बाळगावी. जयंतीच्या दिवशी अभिवादन करून पुढच्या 365 दिवसाचा संकल्प करत प्रत्येक दिवशी डॉ. आंबेडकरांनी सांगितलेल्या संविधानाच्या मार्गावर एक-एक पाऊल पुढे जाण्याचा संकल्प करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

____________________

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, संविधानाचा जयघोष करतांना देशात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत तर कामरूपपासून कच्छपर्यंत प्रत्येक जण आपल्या अधिकाराचा शोध घेत असतो. बोलण्याचे, फिरण्याचे व वागण्‍याचे स्वातंत्र्य आपणास आहे. आंबेडकरांनी संविधानातून जनतेला मूलभूत कर्तव्य सांगितले त्या कर्तव्य व जबाबदारीला महत्व देणे गरजेचे आहे. तसेच स्वतःच्या आसपासचा परिसर हा संविधानाच्या चौकटीत समता, ममता व बंधुत्वावर आधारित एक समूह समाज निर्माण करण्यासाठी योगदान देईल, इतकी भावना पुढच्या 365 दिवसांमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्य करणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

___________________________

तत्पूर्वी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या सिकलसेल आरोग्य तपासणी स्टॉलला भेट दिली.

_____________________________

* पालकमंत्र्यांच्या हस्ते फोटो चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन * 

_________________________________

महानगरपालिका येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील फोटो चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी चित्र प्रदर्शनीचे अवलोकन केले.

______________________________

* समाजासाठी व समाजाच्या हितासाठी उत्तम कार्य  करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार * 

____________________________

समाजासाठी उत्तम कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अशोक घोटेकर, शंकर पाझारे, अजय गणवीर, सुरेश वेल्हेकर, बळीराम महोतव, प्रेमदास मेश्राम, राजू भगत, श्रेया इथापे, रत्नमाला खोब्रागडे, प्रियंका पाटील, आनंदी शेंडे आदींचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

____________________________

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

________________________

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here