_________________________
* चंद्रपुर *
________________________
संस्कार भारती चंद्रपूर शाखेतर्फे वसुंधरा दिन अर्थात भू अलंकरण दिना निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० वाजता दरम्यान स्थानिक एफ ई एस गर्ल्स कॉलेज येथे करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली असून गट अ मध्ये वर्ग ५ ते ७ वी तसेच गट ब मध्ये वर्ग ८ वी ते १० च्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनीं चा समावेश राहणार आहे. या स्पर्धेसाठी गट अ करिता निसर्ग चित्र , माझी वसुंधरा , वृक्षारोपण करणारी मुले , पर्यावरण संरक्षण व संवर्धन तर गट ब करिता माझी वसुंधरा , पाणी वाचवा , सौरऊर्जा वापर , पर्यावरण संरक्षण व संवर्धन हे विषय देण्यात आले आहे.या पैकी कोणत्याही विषयावर स्पर्धक चित्र काढू शकतील .चित्र काढण्यासाठी स्पर्धकांना ड्रॉईंग शीट आयोजकांतर्फे देण्यात येईल. रंग स्पर्धकांना आणावे लागतील. चित्र काढण्यासाठी २ तासांचा वेळ स्पर्धकांना देण्यात येईल.सहभागी शाळांमधून प्रत्येक गटा साठी प्रत्येकी ५ विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धकांसाठी प्रवेश निःशुल्क आहे.
प्रत्येक गटात विजेत्यांना प्रथम , द्वितीय , तृतीय व एक उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात येतील. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत सहभागासाठी श्री किरण पराते चित्रकला विधा प्रमुख 9822141711 आणि सचिव श्री लिलेश बरदाळकर 9960231410 यांच्याशी सम्पर्क साधायचा आहे. या निमित्ताने वसुंधरेचे वैभव अधोरेखित करणारी आकर्षक रांगोळी कार्यक्रम स्थळी श्री सुहास दुधलकर रांगोळी विधा प्रमुख काढणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्कार भारती चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.
__________________________
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
__________________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793