_____________________________
* माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते तालुका क्रीडा संकुल येथे सत्कार *
_________________________
राजुरा (ता.प्र) :– नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या विविध पदाच्या पात्रता परिक्षेत तालुका क्रीडा संकुल राजुरा येथे विद्यार्थ्यांकडून नियमित सराव घेणाऱ्या श्री. छत्रपती क्रीडा अकॅडमी राजुराच्या ८ विद्यार्थ्यांची राज्य पोलीस विभागात विविध पदांवर निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक पाशा शेख सर यांचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.
यात चंद्रपूर पोलीस चालक पदावर राधिका चंद्रशेखर पिपरे, किशोर काशीनाथ कांबळे, नागपूर पोलीस चालक पदावर वैभव पुरुषोत्तम उपरे, चंद्रपूर पोलीस विभागात प्राजक्ता शंकर निखाडे, वैष्णवी आनंदराव पावडे, हर्षा सुधाकर रोगे, अकोला पोलीस विभागात प्रियंका नायराव घुले यवतमाळ पोलीस विभागात वर्षा पैक आत्राम आदींचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
____________________________
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*_
_____________________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793