_______________________
* राजस्थानातील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रपूर महानगरातर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचे अभिनंदन.- डॉ. मंगेश गुलवाडे *
____________________________
चंद्रपूर- भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्ष पदाकरिता राजस्थानचे राज्यपाल तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष श्री. कलराज मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यकारी समितीने एकमताने महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून अध्यक्षपदाकरिता नियुक्ती करण्यात आली.
या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लोककलांना अधिक मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन मिळणार असून विशेषत: ही बाब चंद्रपूर जिल्ह्याकरिता अभिमानाची आहे. त्याबद्दल चंद्रपूर महानगराच्या वतीने भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर महानगराचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचे अभिनंदन केले
______________
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
______________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793