* उत्साहात साजरी झाली अक्षय तृतीया व ईद-उल-फितर *

0
37

++++++++++++++++++++++

+ महानगर भाजपाने दिल्या हिंदू व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा +

+++++++++++++++++++++
महानगरामध्ये हिंदू समाजा तर्फे अक्षय तृतीया,ब्राह्मण समाज तर्फे भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर जयंती व मुस्लिम समाजातर्फे ईद उल फितर सण उत्साहात साजरा करण्यात आला.हिंदू समाज बांधवांनी अक्षय तृतीयेला आपल्या पितरांचे विधीवत कर्मकांड करून स्मरण केले,तर या सोबतच अक्षय तृतीयेच्या पर्वावर ब्राह्मण समाजा तर्फे भगवान परशुरामांचा तर वीरशैव लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वर  यांचा जन्मोत्सत्व भव्य शोभायात्रा कडून साजरा करण्यात आला.मुस्लिम बांधवांनी ठिकठिकाणी ईदगाह येथे जाऊन नमाज अदा केली.याची विशेष दखल घेत भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे शोभायात्रे दरम्यान गिरनार चौक येथे नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ज्यूस व पाणी वितरित करण्यात आले.मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद (ईद उल फितर) उत्साहात साजरी करण्यात आली.
रमजान महिन्यात उपवास, जकात, तरावीह पठण आणि अल्लाहची उपासना केल्यानंतर शुक्रवारी रात्री ईदचा चंद्र दर्शनानंतर सर्वांनी एकमेकांना प्रथम ईदच्या शुभेच्छा दिल्या. शनिवारी सकाळी शहरातील सर्व मशिदी व ईदगाहांमध्ये मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्रची नमाज अदा करून आपले कुटुंब, नातेवाईक व देशवासीयांना सुख-शांती लाभो यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली.
सर्व मशिदींबरोबरच ईद-उल-फितरच्या नमाजासाठी ईदगाह सजवण्यात आली होती. शहरातील ठळकपणे जनता महाविद्यालयासमोरील लस्करी ईदगाह, पठाणपुरा गेट परिसरातील ईदगाह आणि बगाड खिडकी येथील शाही गुप्ता मशिद, दौल उलूम मोहम्मदिया, जामा मस्जिद गांधी चौक, नूरानी मस्जिद भिवापूर, रजा मस्जिद बाबूपेठ, मस्जिद अक्सा जलनगर, गुलशने औलिया घुटकला, ख्वाजा गरीब नवाज मस्जिद रहमतनगर, नूरी मस्जिद रहमतनगर, मदिना मस्जिद तुकुम आदी विविध ठिकाणी ईदची नमाज अदा करण्यात आली.
यावेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री राजेंद्र गांधी,रवींद्र गुरनुले,सुभाष कासंगोट्टुवार,ब्रिजभूषण पाझारे,भाजपा नेते राहुल पावडे,विशाल निंबाळकर,अमीन शेख,चांद पाशा,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
++++++++++++++++++++++

भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर शोभायात्रेचे केले स्वागत
+++++++++++++++++++++++
अक्षय तृतीयेला भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वरांचा जन्मोत्सव असतो.त्या निमित्ताने सायंकाळी 5.30 च्या सुमारास वीरशैव लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वरांची तर 7 वाजताच्या सुमारास भगवान परशुरामाची शोभायात्रा काढण्यात आली.या दोन्ही शोभायात्रेत सहभागी होऊन महानगर भाजपा तर्फे महात्मा बसवेश्वर व भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी लिंगायत व ब्राह्मण समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.

——————————————–

* मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन दिल्या शुभेच्छा *
————————————
ईद उल फितर निमित्य महानगरातील 4 ईदगाहवर मुस्लिम बांधवांनीं प्रार्थना (नमाज )केली.यात जलनगर,तुकुम,चौराळा रोड व जनता कॉलेज येथील ईदगाह समावेश आहे.या चारही पवित्रस्थळी भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात ज्यूस व पाणी चे वितरण करण्यात आले.यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी गळाभेट घेत  मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

**************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

+++++++++++++++++++++

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here