—————————-
*भाजप मध्य मंडळाच्या पदाधिका-यांची मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी*
——————————
* चंद्रपूर:-*
————————————-
अमृत नळ योजनेचा पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत भाजप मध्य मंडळाच्या पदाधिका-यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर करुन मागणी केली आहे.
——————————
सदर निवेदनातून म्हटले आहे की स्थानिक समाधी वार्ड व गणपती वार्ड येथे गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची टंचाई आहे.चंद्रपूर महानगरात अमृत योजनेच्या निमित्ताने या वार्डातील जनता प्रफुल्लीत झाली असे काहीसे वाटले होते.पण गेल्या एक वर्षापासून अमृत योजनेच्या नळाची जोडणी झाली असूनसुद्धा जनतेला तहानलेले ठेवले आहे.सतत एक वर्षापासून तोंडी व लेखी तक्रार देऊनसुद्धा या वार्डातील जनतेला पाण्याच्या संकटातून मुक्त करण्याचा विचार महानगर पालिकेतील अधिका-यांनी केलेला असावा असे आम्हाला दिसत नाही.आज नळ जोडणी करुन एक वर्ष लोटून सुद्धा फक्त टेस्टिंगच्या नावावर जनतेला भूलथापा देत पाण्यापासून वंचित ठेवले आहे.तरी सदर योजनेअंतर्गत लवकरात-लवकर आम्हाला सुरळीत पाणी दिले नसल्यास आम्ही महानगर पालिकेसमोर विराट मोर्चा काढून आंदोलन करु असा इशारा या निवेदनातून दिला आहे.याप्रसंगी मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,नकुल आचार्य,कार्तिक मुसळे,लक्ष्मण महालक्ष्मे, मयुर घरोटे,सतिश चांदेकर,बरेच कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793