***************************
* अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 114 व्या जयंती तथा ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन *
**************************
गावांना केंद्रबिंदू ठेवून गाव कसा असावा, गावातील लोकांचे वर्तन, आचरण कसे असावे गावपुढारी, समाजसेवक कसा असावा, हे ग्रामगीतेतुन राष्टसंत तुकडोजी महाराज यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामविकास कसा घडवता येईल, गावातील तरुणांनी यासाठी कसे प्रयत्नशील राहावे हे विचार अगदी सरळ भाषेत ग्रामगीतेमध्ये त्यांनी मांडले असुन ग्रामगीता म्हणजे ग्रामसंस्कृती आणि ग्रामविकासाचे नितळ रूप असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
**************************
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने तुकडोजी भवन येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 114 व्या जयंती तथा ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्ह्या सेवा अधिकारी अॅड. दत्ता हजारे, जिल्ह्या प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार, तालुका सेवा अधिकारी मुन्ना जोगी, तालुका प्रचार प्रमुख धनराज चौधरी, प्रा. रविंद्र मुरमाडे, डॉ. प्रा. उमाकांत देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
****************************
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. त्या वेळी त्यांनी भारतीय ग्रामीण क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आणि आजही त्यांनी केलेल्या कार्याची अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था प्रेरणा घेत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजाला दिलेल्या विचारांच्या प्रसार प्रचाराचे काम गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने यशस्वीरित्या पार पाडल्या जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
**************************
आजच्या पिढीमध्ये भजन किर्तनाची आवड निर्माण होण्याची गरज आहे. भजन किर्तनात व्यसनमुक्तीची ताकत आहे. आपण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही दरवर्षी महाशिरात्री निमित्त भजन महोत्सवाचे आयोजन करत आहोत. यंदा या आयोजनाचे दुसरे वर्ष होते. यात विविध भाषीय जवळपास ३०० भजन मंडळांनी सहभाग घेत भजन महोत्सवाची भव्यता वाढवली. विशेष म्हणजे लहान मुलांच्या भाजन मंडळांनीहि या भजन महोत्सवात सहभाग घेतला होता. बाल वयात त्यांच्यावर होत असलेल्या या संस्कारातुन उद्याचा सुसंस्कृत नागरिक घडणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
*******************************
यावेळी पाच आदर्श शेतक-यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व ग्रामगीता देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित भजन सन्मेलनामध्ये तालुक्यातील 23 भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. सामुदायीक प्रार्थना आणि राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा व तालुका कार्यकारणी पदाधिकारी व गुरुदेव भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*****************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793