************************
सोमवार दिनांक:- 15 मे 2023 बल्लारपूर शहरात नगरपरिषद ची नवीन इमारत बांधली जाणार ही चर्चा सुरू होताच आम आदमी पार्टीने त्याविरोधात आक्रमक भुमिका घेतली होती. जोपर्यंत नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सुधार होत नाही तोपर्यंत नगरपरिषदेला विरोध राहिल हि पक्षाची भुमिका होती. या भुमिकेनंतर उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी ,तहसिलदार, शिक्षणाधिकारी अश्या अनेक अधिकाऱ्यांसोबत पक्षाच्या बैठका झाल्या. प्रशासनाने वेळोवेळी शाळांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन देखील दिले व त्यानंतर अनेक सुधारणाही झाल्या. नवीन कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती देखील करण्यात आली. आता पुन्हा नव्याने पक्षातर्फे नवीन सत्रापूर्वी आवश्यक नियोजना संदर्भात माहितीची मागणी करण्यात आली. तसेच बल्लारपूर शहरातील तीन विभागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येकी एक अश्याप्रकारे तीन प्राथमिक शाळां तसेच संपूर्ण शहरात एक इंग्रजी माध्यमिक शाळेची मागणी पक्षातर्फे करण्यात आली. यावेळेस मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देतांना शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जिल्हा संघठण मंत्री प्रा.नागेश्वर गंडलेवार, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, सचिव ज्योतिताई बाबरे, युथ अध्यक्ष सागर कांमळे, युथ सचिव रोहित जंगमवार, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दिकी, CYSS सह प्रमुख आशिष गेडाम, अफझल अली, महेंद्र चुनारकर इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
*************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793