*****************
कमी वयात स्व. खासदार सुरेश धानोरकर यांनी राजकीयच नाही तर व्यवसायिक क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळविले.शिवसैनिक ते काँग्रेसचे खासदार असा त्यांचा प्रवास राहिला.जे काही म्हणा बिनधास्त म्हणा असा त्यांचा स्वभाव होता.त्यांच्या या स्वभावामूळे अनेक त्यांचे चाहते होते व आहेत.
महत्वाचे म्हणजे त्यांनी निर्माण केलेले साम्राज्य त्यांनी अबाधित ठेवत आपल्या पत्नीला,भावाला व मित्रांना मनाचे स्थान मिळवून दिले.असे दुसरे उदाहरण शोधून सापडणार नाही.काही दिवसांपूर्वी त्यांच्या बाबांचा मृत्यू झाला.आणि धानोरकर कुटुंबियांचा आधारवड गेला.ही घटना ताजी असतांना काळाने त्यांचेवर अनपेक्षितपणे झडप घातली.समाजमन सुन्न झाले.ते आम्हा सर्वांना इतक्या लवकर पोरकं करून जातील असा विचार कुणी केला .पण असे घडले हे सत्य आहे.त्यांच्या निधनाने आपण सर्वांनी दिलखुलास,निर्भीड व्यक्तिमत्व गमावले आहे.ही पोकळी भरून निघणारी नाही.ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती प्रदान करो.त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या या दुःखाच्या संकटात समस्त भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत आहे.
************************
*डॉ.मंगेश गुलवाडे*
जिल्हाध्यक्ष महानगर भाजपा,चंद्रपूर.
******************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
.********************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793