* ग्रामीण स्वयंवर रोजगार प्रशिक्षण संस्था बाबूपेठ येथे जागतिक योग दिवस साजरा *

0
39

======================

दिनांक 21 5 2023 रोजी बुधवारला स्टार आरसिटी प्रशिक्षण संस्था बाबूपेठ चंद्रपूर येथे जागतिक योग दिवसाच्या संपूर्ण समिश्र दिवसभराचा कार्यक्रम संपन्न.सदर कार्यक्रमासाठी संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षणात यामध्ये मोबाईल रिपेरिंग प्रशिक्षण, मत्स्य पालन प्रशिक्षण या दोन विषयातील सत्तर लाभार्थ्यांनी भाग घेतला त्याप्रसंगी सकाळी योगाचा अभ्यास योगावर श्री मोकाशे सर यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले त्या कार्यक्रमास प्रामुख्याने संचालक श्री प्रफुलजी अलुरवार , प्रशिक्षक अक्षयजी लांजेकर, प्रशिक्षक अनुप कासवटे, लेखा सहाय्यक सोनू जेंगठे सर या कार्यक्रमास बाहेरून विशेष अतिथी प्रशिक्षक म्हणून लाभलेले समिश्र विषयी शिकवणारे श्री शशिकांत मोकाशे हे प्रामुख्याने उपस्थित होते. याच दिवशीच्या द्वितीय सत्र मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री देशपांडे साहेब प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ इंडिया लीड बँक मॅनेजर श्री धोंगडे साहेब विषय प्रशिक्षक मत्स्यपालन श्री नागपुरे सर मोबाईल रिपेरिंग विशेष प्रशिक्षक श्री शिंदे सर वर्धा हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते, अध्यक्ष भाषनातं श्री देशपांडे सर यांनी शासनाने दिलेल्या अनुदानाचा व शासनाने राबविलेल्या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा ज्यामुळे तुमच्या उज्वल भविष्यासाठी पुढे जीवन जगण्यासाठी कामात येईल असे संबोधन केले. विशेष अतिथी म्हणून लाभलेले एल डी एम श्री धोंगडे सर यांनी शासनाने दिलेल्या निशुल्क व्यवस्थेला आपलं समजून प्रशिक्षण कालावधीत एक उत्कृष्ट प्रशिक्षण कसे करता येईल त्यासाठी असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात यावे असेही सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन आरसीटीचे मार्गदर्शक प्रशिक्षक श्री शशिकांत मोकाशी यांनी केले

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here