* शासकीय जमिनीवरील अवैध अतिक्रमण काढण्यासाठी महीला धडकल्या तहसिलवर *

0
29

***************************

वरोरा दि ३जुलै:- वरोरा तालुक्यातील मौजा चिनोरा अंतर्गत येणाऱ्या पारधी टोला पिपरबोडी येथे शासनाची महसुल विभागाची भुमापण क्रमांक २,आराजी ९हेक्टर ५४आर सरकार जमीन असुन त्या जागेवर स्वातंत्र्य पुर्व काळापासून पारधी समाजाची आदिवासी वस्ती असुन तिनसे लोकवस्ती चे गाव आहे, शासनाने पारधी समाजाला सोयी सुविधा उपलब्ध करून देल्या आहे, यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, हातपंप, सौरऊर्जा पाण्याचा पंप ,नळयोजना, माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांच्या निधीतून रोडचे बांधकाम करण्यात आले आहे, तसेच हनुमान मंदिर,माता मंदिर, आहे सुद्धा आहे, यासाठी जवळपास अंदाजे दहा एकर जागा व्यापली आहे,तर उर्वरित जमीन ही पडिक होती,ति ग्रामपंचायत ने गुरे ढोरे चराईसाठी राखिव ठेवली होती परंतु शेजारच्या शेतकऱ्यांनी पडित शासकीय जमिनीवर अवैध अतिक्रमण करून वहिवाट करत आहेत, येथील महिला बचत गटांना शासनाने व बॅंकेच्या माध्यमातून शेळ्या दिल्या आहेत त्या शेळ्या चराईसाठी जागा शिल्लक नसल्याने मोठी पंचाईत निर्माण झाली आहे,केलेल्या अतिक्रमणामुळे गावकऱ्यांना गुरे ढोरे चारण्यासाठी मोठ्या प्रमाणात ञास सहन करावा लागत आहे, महिलांना शौचास जाण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे महिलांनी बोलुन दाखवले, सरकारी जागेवरील केलेले अवैध अतिक्रमण लवकरात लवकर काढावे याकरिता पारधी टोला पिपरबोडी चिनोरा येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा चंद्रपूर जिल्हा आदिवासी हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांच्या नेतृत्वामध्ये वरोरा तहसीलदार श्री योगेश कौटकर यांना निवेदन दिले आहे.यामध्ये लता नंनावरे, शांताबाई शेरकुरे, शारदा नंनावरे, कांताबाई शेरकुरे, वृंदा शेरकुरे,फुलाबाई घोसरे,आशा भोसले, रत्नमाला शेरकुरे,आदि महिला उपस्थित होत्या.

****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here