* स्वयंरोजगाराचे कौशल्य प्राप्त करून स्वत: व्यवसायिक बना – आ. किशोर जोरगेवार *

0
39

**************************

* यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने बाबुपेठ येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन * 

********************************

    स्पर्धेच्या युगात रोजगार मिळविणे कठीण झाले आहे. अशात आता स्वयंरोजगाराकडे वळण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता अनेक महागडे प्रशिक्षण महिलांना नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याच संकल्प आपण केला आहे. या शिबिरातून महिलांनी स्वंयम रोजगाराचे कौशल्य प्राप्त करून स्वत:  व्यवसायिक बनावे  असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने बाबुपेठ येथील माहेर घर येथे नि:शुल्क ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 1 महिना चालणार असलेल्या या  शिबिराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार, स्कील इंडियाच्या कार्यकारी व्यवस्थापिका श्रध्दा मोहिते, श्रेत्रीय व्यवस्थापिका दिप्ती कोहाड, केक मेकींग प्रशिक्षिका ममता पेकडे, ब्युटी पार्लर प्रशिक्षीका किर्ती गुरुनुले, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, मेकअप आर्टिस्ट नुतन कोलावार, अल्पसंख्यांक विभागाच्या महिला शहर प्रमूख कौसर खान, बहुजन महिला आघाडीच्या महिला प्रमूख विमल काटकर, आशु फुलझेले, कविता निखारे, नंदा पंधरे, कल्पना शिंदे, वंदना हजारे, निलिमा वनकर, आशा देशमूख, माधूरी निवलकर, अनिता झाडे, सरोज चांदेकर, किशोर बोलमवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, शिक्षण आणि रोजगार या दोन क्षेत्रात मोठे काम करायचे आहे. निवडून आल्या नंतर आपण या दोनही क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. आज बाबुपेठ येथे आपण ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरु केले आहे. या शिबिरातून कौशल्य प्राप्त करत महिलांनी आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधावा असे ते यावेळी म्हणाले.
बाबुपेठ येथील अपुर्ण विकासकामे पुर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न राहिले आहे. या भागात आपण मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हिंग्लाज भवानी वार्डात अनेक समस्या आहेत. त्यामुळे त्या सोडवून येथे उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून येथे लवकरच विकासकामांना सुरवात होणार आहे. बाबुपेठ येथे बहुतांश वर्ग हा कामगार आहे. या कामगार वर्गातील मुलांना उत्तम शिक्षण घेता यावे यासाठी आपण महादेव मंदिर येथे जवळपास साडे तिन कोटी रुपयांच्या अभ्यासिकेचे निर्माण करत आहोत. तर येथील सावित्रीबाई शाळा मॉडेल स्कुल बनविण्यासाठी आपण 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचेही यावेळी बोलताना ते म्हणाले.
रोजगाराच्या संधी कमी आहेत. त्यामुळे आता स्वयंरोजगाराकडे आपला कल वाढविण्याची गरज आहे. मात्र स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षीत होणे गरजेचे आहे. याचे प्रशिक्षणही महाग आहे. त्यामुळे आता आपण मतदार संघातील विविध भागात विविध प्रकारचे प्रशिक्षण नि:शुल्क देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहोत. यात केक मेकींग, ब्युटी पार्लर, शिवणकाम, मोबाईल रिपेअरींग असे प्रशिक्षण आपण देत आहोत. आज बाबुपेठ येथील प्रशिक्षण शिबिरात जवळपास दोनशेहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. हे या उपक्रमाचे यश आहे. या प्रशिक्षण शिबिरात आपण प्रशिक्षीत होउन स्व:ताचा व्यवसाय सुरु करत रोजगार निर्मीतीसाठी आपले योगदान द्यावे असेही ते यावेळी म्हणाले.
सदर शिबिरात हेअर स्टाईल, व्हॅक्स, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज, शॅम्पू, मेहंदी, डाय, फेशिअर, प्लकींग, साडीचे प्रकार, मेकअप, हेअर कटींग, पार्टी वेअर मेकअप आदी प्रकारचे प्रशिक्षण महिलांना दिल्या जाणार आहे. या शिबिराला स्थानिक महिलांची शेकडोच्या संख्येने उपस्थिती होती.

****************************

    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

***************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here