***************************
* मनपा आयुक्त यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधत घेतला पूरपरिस्थितीचा आढावा *
***********************
मध्यरात्री पासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अश्या भागांची पाहणी करुन बेघर झालेल्या नागरिकांच्या राहण्याची तात्काळ व्यवस्था करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना केल्या आहे .
**************************
आमदार किशोर जोरगेवार यांनी दूरध्वनी वरून महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांच्याशी संपर्क साधत पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. परिसरातील मनपा शाळा आणि सभागृह नागरिकांसाठी खुले करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे.
****************************
मागील १४ तासापासून शहरात पावसाचा जोर कायम आहे. शहरातील बाबानगर बाबूपेठ, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी, जलनगर, रय्यतवारी कॉलरी, महाकाली कॉलरी, नानाजी नगर वडगाव, राष्ट्रवादी नगर या भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. अनेकांच्या घरातील अन्नधान्य पावसाच्या पाण्याने खराब झाले आहे. या सर्व परिस्थितीची आमदार जोरगेवार यांनी माहिती घेतली असून यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अश्या भागांची पाहणी करुन पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहे.
****************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
***************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793