************************
मेजर गेट दुर्गापूर येथील आशा अरविंद जयस्वाल यांचे नावी असलेल्या देशी दारू चिल्लर विक्रीच्या परवान्या खाली दुकानात दिनांक 16/07/2023 रोजी संपूर्ण आंबेडकरी जनतेला हालवून सोडणारी अशी घटना एका सुधन्यान नागरिकां मुळे उघडकीस आली.
त्या देशी दारू दुकानाच्या मुत्रीघरात चक्क परमपूज्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर लावून त्यावर अनेक दिवसापासून विटंबना केल्या जात होती. ही घटना सर्व बहुजन बांधवावर आघात करणारी होती फिर्यादी सुनील पाटील यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्या आस्थापनात कार्य करणाऱ्या सर्व लोकांवर भारतीय दंड संहिता 1860 नुसार 295-अ,34 या प्रमाणे कलमा लावण्यात आल्या.
भिम आर्मी (भारत एकता मिशन ) जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ रायपुरे यांनी घटनास्थळी भेट घेत त्या कलमा व्यतिरिक्त ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मांगणी करीत घटनेचे गांभीर्य व होणारे दुष्परिणाम याची जाणीव एस.डी पी.ओ.नंदनवार साहेब व दुर्गापूर पोलीस स्टेशनं चे पी. आय. अनिल जिट्टावार साहेब यांना करून दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस प्रशासनाने सहकार्याची भूमिका बजावत राज्यघटनेत नमूद असलेल्या दंड संहिता नुसार सर्व आरोपीवर वरील नमूद कलमात वाढ करीत 3(1)(T) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारित अधिनियम 2015 अन्वये अतिरिक्त कलम लावून गुन्हा दाखल केला.
भिम आर्मी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, मा. पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर तसेच मा.अधीक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांना निवेदन देत आशा अरविंद जयस्वाल यांचा नावे असलेला देशी दारू चिल्लर विक्रेता परवाना रद्द करण्यात यावा अशी मांगणी केली.
मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी आश्वासन दिले कि चार ते पाच दिवसात योग्य ती कार्यवाही केल्या जाईल. सुरेंद्र रायपूरे यांनी त्यांना आठ दिवसाचा अवधी देत म्हटले कि आठ दिवसात जर त्याचा परवाना रद्द व ती देशी दारूचे दुकान कायमचे बंद केल्या गेले नाही तर भिम आर्मी (भारत एकता मिशन) उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल.
यावेळस प्रामुख्याने भिम आर्मीचे जिल्हा सदस्य कमलेश रामटेके,अमर रामटेके,जिल्हा संघटक विशाखाताई आमटे, तालुका प्रमुख हिमांशू आवळे, महानगर प्रमुख ऍड. प्रशांत रामटेके, भीमराव आमटे, धीरज भाऊ दुर्योधन,ऊर्जानगर शाखा प्रमुख छोटू तितरे, बाळू रायपुरे, भिमा गेडाम,स्वप्नील शेंडे,क्रितिका आमटे,देविदास रामटेके, कांचन अहुजा, संगीता रायपुरे, छोटी रायपुरे,संतोष खांडेकर, मनोज शेंडे, साहील रायपुरे, मनीष रामटेके, प्रकाश खांडेकर,देवानंद रामटेके सोबत असंख्य सैनिक हजर होते.
सोबत समता सैनिक दलाचे अध्यक्ष अनंता बाबरे, प्राविण्य पाथर्डे, तसेच इतर सैनिक आणि आवाज़ संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष – निलेश ठाकरे व जिल्हा सचिव प्रणित भगत सोबत प्रतिष्ठित जागरूक युवा विनीत तावाडे, सुनील पाटील, रवी पवार व इतर तसेच जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक राजू भाऊ झोडे,निशा ताई धोंगडे व सहकारी , अमर धोगडे व सहकारीy तसेच असंख्य ऊर्जानगर कोंडी,वेंडली, दुर्गापूर येथील असंख्य बहुजन बांधव उपस्थित होते.
****************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
******************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793