*****************************
*मुक्या जनावरांच्या तस्करीला आळा घालण्यात यावा*
*******************************
चंद्रपूर शहरातील लखमापूर हनुमान मंदिर येथे एका लावारिस जनावराची त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून देखभाल करण्यात येत होती. अनेक वर्षापासून हा बैल परिसरात लावारिस असल्यामुळे श्रद्धेपोटी त्या परिसरातील नागरिक त्या जनावराला खाऊ पिऊ घालत होते. मागील दोन दिवसापूर्वी काही चोरट्यांनी या मुख्य जनावराला पकडून स्वतःच्या मालकीच्या असे सांगून त्याला पळवून नेण्याच्या तयारीत असताना मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांनी व वार्डातील काही जागरूक नागरिकांनी त्या इसमांना विचारपूस केली असता वाहन चालक पळून गेले त्यानंतर सदर प्रकरणाची रामनगर पोलीस स्टेशनमध्ये मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप सुनिल चंदनखेडे यांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीला अटक करून त्यांच्यावर ३७९,५११,३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
********************************
सविस्तर वृत्त असे की, तक्रार कर्ते कुलदिप चंदनखेडे यांचा ट्रासपोर्टचा व्यवसाय आहे. ते राहत असलेल्या परीसरात एक कथ्थ्या रंगाचा मोकाट व लावारीस बैल वय अंदाजे 2 वर्ष हा 2 वर्षापासुन लखमापुर हनुमान मंदिर वडगाव परीसर शर्मा चौक येथे लहाणपणापासुन फिरत होता. त्या बैलाला कोणीही मालक नसल्यामुळे परिसरातील लोक सुध्दा त्याला काहीही ना काही चारत असतात त्यामुळे तो बैल परिसरातील नागरिकांचा ओळखीचा झाला. गुरूवार दि. 26/07/23 रोजी दुपारी अंदाजे 01/00 वा दरम्यान शर्मा चोक येथे आपली गाडी धुण्याकरीता ठक्कर टाईल्स बाजुला ईरई नदी जवळ वाशींग सेटरला गेले तेव्हा गाडी क्र. MH 33 G 115 टाटा पीकअप या पांढ-या रंगाच्या गाडी 5 ते 6 इसम या परीसरातील बैल चढवत होते. त्यांनी बघीतल्यावर त्यांना शंका आल्याने ओळखीचे असलेले पवन अग्रवाल, अमीत अग्रवाल, रनवीरसिंग गौतम प्रेम नवघरे, मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार इत्यादी लोकांनी मीळुन गाडीचे चालक याला विचारपुस केली की, हा बैल तुम्ही कुठे नेत आहे ? असे विचारले असता त्याने सांगीतले की त्यानी खैरगाव येथुन हा बैल खरेदी केला असे सांगीतले त्यामुळे आम्ही त्याच्या सदर बैलाची खरेदी पावती मागीतली असता टोंगे यांनी आम्हाला सांगीतले की, बैल ईजाज या व्यक्तीला 5000 रूपयात विकला आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला बैल विक्रीबाबत उडवाउडवीचे उत्तर दिले त्यानंतर तक्रार कर्ते व शेजाऱ्यांला गाडीमध्ये बैल भरणारा इसमाने हा बैल माझा असुन तो हरविला होता असे खोटे सांगीतले तसेच त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव रमेश टोंगे रा कोसारा ता जि चंद्रपुर सांगीतले गाडीचा चालक याला त्याचे नाव विचारले असता त्याने नाव अफरोज शेख रा रहमतनगर चंद्रपुर असे सांगीतले काही वेळाने गाडीचा चालक अफरोज शेख तेथून पळुन गेला तसेच गाडीचा चालक अफरोड शेख रा रहमतनगर चंद्रपुर व रमेश टोंगे रा कोसारा चंद्रपुर यांनी मिळुन परीसरातील मोकाट व लावारीस बैल त्यांची गाडी क्र.MH 33 6 115टाटा पिकअप या पांढ-या रंगाचा गाडीत भरून चौरून घेवुन जाण्याचा प्रत्यन करीत असताना त्याला जागीच पकडले आहे करीता त्याच्यावर वरील इसमांना गुन्हा दाखल करण्यात यावा, यासंबंधात तक्रार करण्यात आली आहे. तरी मुक्या जनावरांची तस्करी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.
*****************************
यानंतर मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे आणि त्यांच्या सोबत सहकारी लोक त्यांनी इशारा सुद्धा दिला की जर या नंतर अशे कुठलेही प्रकार होतील तर आम्ही खपवून घेणार नाही अशे प्रकार घडतील तर सर्वे हिंदू संघटना एकत्रित येऊन याच्यावर सडेतोड उत्तर देऊ.
******************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
******************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793