*****************************
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्राला मध्ये मध्य चांदा वनविभागाच्या उप वनसंरक्षक श्वेता बोडु यांनी भेट देत महिलांना मागदर्शन केले. तसेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजीत या शिबिराचे कौतुकही यावेळी बोलताना त्यांनी केले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या सायली येरणे, कल्पना शिंदे, आशु फुलझेले, निलीमा वनकर, दर्शना चाफले, कविता निखारे, शमा काजी, विमल काटकर, अनिता झाडे, ब्युटी पार्लर प्रशिक्षिका किर्ती गुरनुले आदींची उपस्थिती होती.
महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध भागात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. यात ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शिवणकाम प्रशिक्षण, मोबाईल रिपेरिंग यासारखे प्रशिक्षण दिल्या जात आहे.
दरम्यान बाबूपेठ येथील माहेरघर येथे सुरु असलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराला मध्ये चांदा वनविभागाच्या उप वनसंरक्षक श्वेता बोडु यांनी भेट दिली. यावेळी या प्रशिक्षणाची संपुर्ण माहिती जाणून घेत त्यांनी उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षीत होऊन स्वयंरोजगर सुरु केल्यास आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. याचा फायदा कुटुंबाला होतो. कमी भांडवलात आपण आपल्या घरी ब्युटी पार्लर सुरु करुन यातून आर्थिक सक्षम होऊ शकतो असे त्या यावेळी म्हणाल्या. या कार्यक्रमाला प्रशिक्षार्थी महिलांसह स्थानिक नागरिकांचीही उपस्थिती होती.
*****************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*****************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793